जळगाव जिल्ह्यात ७१ हजार शौचालयांचे काम बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:56 PM2018-03-21T12:56:35+5:302018-03-21T12:56:35+5:30

८५ टक्के काम पूर्ण

71 thousand toilets in | जळगाव जिल्ह्यात ७१ हजार शौचालयांचे काम बाकी

जळगाव जिल्ह्यात ७१ हजार शौचालयांचे काम बाकी

Next
ठळक मुद्देदोन महिन्यात उद्दीष्टपूर्ती जिह्यातील हगणदारीमुक्तीच्या कामावर नाराजी

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २१ - स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिह्यातील नऊ तालुक्यांमध्ये हगणदारीमुक्तची ८५ टक्के काम पूर्ण झाले असून अर्ध्याहून अधिक मार्च महिना उलटला तरी ७१ हजार वैयक्तिक शौचालयांची कामे बाकी आहे. येत्या दोन महिन्यात जिह्यातील कामे पूर्ण होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी दिली.
शासनाच्यावतीने राज्यभरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदारीमुक्तीच्या कामांना गती देण्यात येत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये हागणदारी मुक्ती जाहीर करण्यात आली आहे, मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये कामे अद्याप अपूर्ण आहेत अशा जिल्ह्यांचा शासनातर्फे आढावा घेतला जात आहे. यासंदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग उपसंचालक रुचेष जयवंशी यांनी गेल्या आठड्यात जिल्हा परिषदेत येऊन कामकाजाचा आढावा घेतला असता जिह्यातील हगणदारीमुक्तीच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच जिल्ह्यात त्यामुळे उर्वरित सर्व कामे येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.
जिल्ह्यात जळगाव, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, पारोळा, चोपडा, यावल या नऊ तालुक्यात शौचालयांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. उपसंचालकांच्या सूचनेनुसार प्रत्येक गावात स्थानिक अधिकारी नेमून कामांना गती देण्यात आली असली तरी ही कामे मार्च अखेर पूर्ण होणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात हगणदारीमुक्तीसाठी एकूण २ लाख ४ हजार २९१ वैयक्तिक शौचालयांचे उद्दीष्ठ देण्यात आले होते, त्यापैकी आतापर्यंत १ लाख २३ हजार ९९१ शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे. तर ७१ हजार १०२ कामे बाकी आहेत. यासाठी वर्षभरात ५३ कोटी ७३ लाखांचा निधी खर्च झाला आहे. यात ८२ हजार लाभार्थ्यांचे अनुदान देणे बाकी आहे. तर उर्वरित कामांसाठी पुन्हा ९७ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
धरणगाव - ९५२४, भडगाव ९५०७, भुसावळ - २४, बोदवड - २९६८, एरंडोल - ८१४४, मुक्ताईनगर - ६७०८, रावेर - १०६६०, जळगाव - ९७७९, पारोळा - ७२०२, यावल - ८१३३, अमळनेर - १००३४, चोपडा- ८६९४, चाळीसगाव - ११४०७, पाचोरा - १०३६४, जामनेर - १०८४३ असे एकूण १ लाख २३ हजार ९९१ शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. यात धरणगाव, भडगाव, भुसावळ, बोदवड, एरंडोल, मुक्ताईनगर हे सहा तालुके हगणदारीमुक्त झाले आहेत.

Web Title: 71 thousand toilets in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.