फ्रीजच्या स्फोटाने ६४ हजार खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:51 IST2019-06-25T22:50:41+5:302019-06-25T22:51:22+5:30

अमळनेर : तालुक्यातील गडखांब येथील रहिवासी यशवंत पुरुषोत्तम पाटील हे सकाळी घराला कुलूप लावून शेतात कामासाठी निघून गेले असता ...

64 thousand Khak | फ्रीजच्या स्फोटाने ६४ हजार खाक

फ्रीजच्या स्फोटाने ६४ हजार खाक



अमळनेर : तालुक्यातील गडखांब येथील रहिवासी यशवंत पुरुषोत्तम पाटील हे सकाळी घराला कुलूप लावून शेतात कामासाठी निघून गेले असता त्यांच्या घरातील फ्रीजचा अचानक आवाजासह स्फोट झाला. ही घटना २४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.
स्फोट होताच तत्काळ शेजाऱ्यांंंंनी घरातील आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत स्वयंपाक घरातील संसारोपयोगी वस्तू खाक झाल्याचे निदर्शनास आले. पाटील यांनी बियीणे खरेदीच्या हेतूने घरात ठेवलेली ६४ हजार रोख रक्कम जळून खाक झाली. या घटनेतून एकूण १ लाख ७२ हजारांचे नुकसान झाल्याचा उल्लेख करीत घटनेचा पंचनामा तलाठी महाजन यांनी केला आहे.

Web Title: 64 thousand Khak