शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ६३ हजार ५६० अर्ज ; महाविद्यालयांच्या लॉगिनला ४ हजार ७१७ अर्ज पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST

डमी - स्टार - ८५८ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी आतापर्यंत ६३ हजार ५६० विद्यार्थ्यांनी अर्ज ...

डमी - स्टार - ८५८

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी आतापर्यंत ६३ हजार ५६० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी ४ हजार ७१७ विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही महाविद्यालयातच्या लॉगिनला पडून आहेत. प्रलंबित अर्जांची पडताळणी करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याचे आवाहन महाविद्यालयांना करण्‍यात आले आहे.

केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुषंगाने शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षातील शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन पध्दतीने समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. यासाठी विभागाद्वारे महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्‍यात आले आहे. विद्यार्थ्यांना ३१ मे पर्यंत अर्ज करण्‍याची मुदत दिली होती. ही मुदत वाढवून ३० जून करण्यात आली होती.

एससी प्रवर्ग

किती अर्ज ऑनलाइन सादर केले - १०,०८८

समाज कल्याण विभागाने निकाली काढले -७,६४२

महाविद्यालयात प्रलंबित अर्जाची संख्या - ६९७

व्हीजेएनटी प्रवर्ग

किती अर्ज ऑनलाइन सादर केले - ५३,४७२

समाज कल्याण विभागाने निकाली काढले - ४०,१९०

महाविद्यालयात प्रलंबित अर्जाची संख्या - ४,०२०

कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यातच शिक्षण ऑनलाइन असून त्यात विविध डेटा पॅकची भर पालकांच्या माथी पडली आहे. असे असून देखील महाविद्यालयांकडून संपूर्ण फी वसूल केली जात आहे. त्यातच विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती मात्र अद्यापही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुध्दा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

-रितेश महाजन, विद्यार्थी,

ज्या विद्यार्थ्यांनी आधी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहे. त्यांच्या अर्जांना तात्काळ मंजूरी देण्यात यावी. विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील शिष्यवृत्तीची रक्कम सुध्दा अजून मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग करण्यात यावी.

- विकास मोरे, विद्यार्थी,

लवकर मिळणार शिष्यवृत्ती

एकूण ६३ हजार ५६० विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ३५ हजार ९७५ विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. लवकरच ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. दरम्यान, अर्जासाठी पुन्हा मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे अर्ज करता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होवू शकते.