जळगाव तालुक्यात ५९ जागा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST2021-01-08T04:46:32+5:302021-01-08T04:46:32+5:30
जळगाव : माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून आता प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील ५९ जागा बिनविरोध झाल्या असून ४०४ ...

जळगाव तालुक्यात ५९ जागा बिनविरोध
जळगाव : माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून आता प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील ५९ जागा बिनविरोध झाल्या असून ४०४ जागांसाठी ९६५ उमेदवार रिंगणात आहेत. यात मोहाडी, डिकसाईच्या १८ जागांचा समावेश आहे.
तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात दोन ग्रामपंचायती बिनिवरोध निवडून आले आहे. दरम्यान, तालुक्यात १७० केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याचे नियोजन तहसील प्रशासनाने केलेले आहे.
बिनविरोध जागा अशा
मोहाडी ११, डिकसाई ७, सावखेडा बुद्रूक ५, आव्हाणे ४, कडगाव ४, तरसोद ४, तुरखेडा ३, रायपूर ३, पिलखेडा ३, जळगाव खुर्द, तिघ्रे, खिर्डी ३, फुफणी ३, वडनगरी २ भादली, नशिराबाद, चिंचोली, रिधूर प्रत्येकी १