जिल्ह्यात एका वर्षात ५६ खून, ८१ बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST2021-01-08T04:47:16+5:302021-01-08T04:47:16+5:30

जळगाव : गेल्या वर्षात कोरोनाचे संकट असतानाही त्याच्या मागील वर्षापेक्षा जिल्ह्यात क्राईम वाढलेला असल्याचे दिसून आले. जानेवारी ते डिसेंबर ...

56 murders, 81 rapes in a year in the district | जिल्ह्यात एका वर्षात ५६ खून, ८१ बलात्कार

जिल्ह्यात एका वर्षात ५६ खून, ८१ बलात्कार

जळगाव : गेल्या वर्षात कोरोनाचे संकट असतानाही त्याच्या मागील वर्षापेक्षा जिल्ह्यात क्राईम वाढलेला असल्याचे दिसून आले. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात ५६ खून झाले तर ८१ महिला, तरुणींवर बलात्कार झाला आहे. त्याशिवाय चोरीच्या १२२३ तर जबरी चोरीच्या १३० घटना घडल्या असून दरोड्याच्याही १८ घटना घडलेल्या आहेत. खून, बलात्कार वगळता इतर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण मात्र अगदीच नगण्य आहे.

दंगलीच्या घटनांमध्ये देखील वाढ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. २०१९ मध्ये दंगलीच्या २८९ घटना घडल्या होत्या तर मागील वर्षात दंगलीच्या ३५७ घटना घडल्या. दंगलीच्या घटनांमध्ये सर्वच आरोपी अटक झालेले असले तरी सामान्य व निष्पाप नागरिकांना या दंगलीची झळ बसली आहे. विनयभंगाच्या देखील २८८ घटना घडल्या आहेत, २०१९ मध्ये २७१ घटना घडल्या होत्या. मागील वर्षात सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे. खुनाच्या ५६ घटना घडलेल्या असल्या तरी अद्यापही ३ घटना उघडकीस आलेल्या नाहीत.

खुनातील मयताचींच ओळख पटेना (इन्फाे)

१) जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावखेडा शिवारात ऑक्टोबर महिन्यात ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा खून झाला आहे. या खुनातील मारेकरी तर सोडाच पण, मयत व्यक्तीची ओळख पटविणेही पोलिसांकडून शक्य झालेले नाही.

२) मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोडसगाव शिवारात ६ जानेवारी २०२० रोजी तीक्ष्ण हत्याराने अनोळखी व्यक्तीचा खून झाला आहे. या घटनेतील व्यक्तीचे मुंडके व धड वेगळे झाले होते. याचा देखील उलगडा झालेला नाही. मयताचीच ओळख पटत नसल्याने मारेकरी कोण? हे शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

३) २०१९ मध्ये देखील निंबाेल येथील बँकेचा अधिकारी व जळगाव शहरातील कोंबडी मार्केटजवळ प्रशांत वाणी या तरुणाचा खून झाला होता. हे दोन्ही गुन्हे अद्यापही उघड झालेले नाहीत.

वर्षभरात पाच हजार गंभीर गुन्हे

जिल्ह्यात भाग १ ते ५ या प्रकारात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्याच्या कालावधीत ५ हजार १६३ गुन्हे घडले आहे. त्यापैकी ३ हजार ६२९ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ३३४ गुन्हे प्रलंबित आहेत. ७० टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. २०१९ मध्ये ४ हजार ८२९ गुन्हे घडले होते, त्यापैकी ३ हजार ६२५ गुन्हे उघड झाले होते. या वर्षात ७५ गुन्हे उघडकीस आले होते.

Web Title: 56 murders, 81 rapes in a year in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.