जळगाव : धानवड येथील मुलीस द्यावयाचे असलेले ५० हजार रुपये रावण ओंकार पाटील (६५, रा.धुपे बु.ता.चोपडा) यांच्या खिशातून चोरट्यांनी काढून घेतल्याची घटना रविवारी दुपारी नवीन बसस्थानकात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातही दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडणा-या लहान मुलांना पकडण्यात आले होते.सातत्याने घटना घडत असताना पोलिसांकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही.रावण पाटील हे धुपे बु. येथे वास्तव्यास असून ते शेती करतात. प्रशांत व शरद ही दोन्ही मुले नाशिक येथे कंपनीत कार्यरत आहेत. दरम्यान रावण पाटील यांची मुलगी सुरेखा रावसाहेब पाटील ही धानवड येथे वास्तव्यास आहे. तिला पैसे देण्यासाठी प्रशांत याने वडील रावण पाटील यांच्याजवळ ५० हजार रुपये दिले होते. ही रक्कम मुलीस देण्यासाठी ते चोपडा येथून सकाळी ११ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकावर आले. दुपारी १२ वाजता जामनेर बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील ५० हजाराचे बंडल चोरट्यांनी काढून घेतले. बसमध्ये चढल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावात वृध्दाच्या खिशातून लांबविली ५० हजाराची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 21:19 IST
धानवड येथील मुलीस द्यावयाचे असलेले ५० हजार रुपये रावण ओंकार पाटील (६५, रा.धुपे बु.ता.चोपडा) यांच्या खिशातून चोरट्यांनी काढून घेतल्याची घटना रविवारी दुपारी नवीन बसस्थानकात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातही दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडणा-या लहान मुलांना पकडण्यात आले होते.सातत्याने घटना घडत असताना पोलिसांकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही.
जळगावात वृध्दाच्या खिशातून लांबविली ५० हजाराची रोकड
ठळक मुद्देनवीन बसस्थानकातील घटना सातत्याने होताहेत चो-या पोलिसांचे दुर्लक्ष