एरंडोल येथे वीजचोरी प्रकरणी ५ लाख ८३ हजार रुपये दंडाची रक्कम वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:21+5:302021-09-09T04:21:21+5:30
एरंडोल : येथे २०२१ या वर्षात वीजचोरी करणारे ४५ ग्राहक आढळून आले. त्यांच्याकडून ५ लाख ८३ हजार ३४५ रुपये ...

एरंडोल येथे वीजचोरी प्रकरणी ५ लाख ८३ हजार रुपये दंडाची रक्कम वसूल
एरंडोल : येथे २०२१ या वर्षात वीजचोरी करणारे ४५ ग्राहक आढळून आले. त्यांच्याकडून ५ लाख ८३ हजार ३४५ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार शैलेश चौधरी यांना माहितीच्या अधिकारातून एरंडोल वीज उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता महाजन यांनी दिली.
शैलेश चौधरी यांनी वीज प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारात सन २०२० ते १९ जुलै २०२१ दरम्यानच्या शहरातील एकूण वीज चोऱ्या, सन २० ते २१मधील वीजचोरी मोहिमेचा कालावधी कुठून कुठपर्यंत होता वा आहे तसेच औद्योगिक प्रतिष्ठानांना असलेले दर आदींबाबत माहिती मागितली होती. वीजचोरी प्रकरणातील ग्राहकांची विगतवारी दिली नाही. यामागे नेमके गौडबंगाल काय? तसेच जिल्हा भरारी पथकाकडून सूचना आल्यावरच स्थानिक वीज प्रशासन वीजचोरीची मोहीम राबवते, अशी तोंडी माहिती उपअभियंता महाजन यांनी दिली आहे.