४८ टक्के विद्यार्थी उपस्थि तर अजूनही ५२ टक्के विद्यार्थी शाळेबाहेरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST2021-01-08T04:47:00+5:302021-01-08T04:47:00+5:30
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होवून महिना पूर्ण होण्यास आला आहे. या एका महिन्यात ...

४८ टक्के विद्यार्थी उपस्थि तर अजूनही ५२ टक्के विद्यार्थी शाळेबाहेरच !
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होवून महिना पूर्ण होण्यास आला आहे. या एका महिन्यात एकही विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आलेला नाही, ही समाधानकारक बाब समोर आली आहे.
दरम्यान, एकूण उपस्थितीच्या तुलनेत ४८.७७ विद्यार्थी शाळांमध्ये हजेरी लावत असून ५२ टक्के विद्यार्थी अजूनही शाळाबाहेरचं आहे. अर्थात या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे.
राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून शाळा सूरू करण्याचे आदेश दिले हाते. मात्र, जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झालेला नसल्यामुळे ८ डिसेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. आता शाळा सुरू होवून एक महिनापूर्ण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळांमधील उपस्थितीचा आढावा घेतला असून ताे समाधानकारक असल्याचे आढळले आहे. शिक्षक व विद्यार्थी ठणठणीत असल्याचे समोर आले आहे.
एकही विद्यार्थी संक्रमित नाही...
महिनाभरात जिल्ह्यात एकही विद्यार्थी कोरोना संक्रमित झालेला नाही. शाळा सुरू होण्याआधी शिक्षकांची तपासणी केली असता, त्यात काही शिक्षक कोरोना बाधित आढळून आले होते. मात्र, आता एकही शिक्षक कोरोना बाधित आढळून आलेला नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांकडून संपूर्ण काळजी घेतली जात आहे. सॅनिटाईज करूनच विद्यार्थांना प्रवेश दिला जात आहे.
जिल्ह्यातील ८ शाळा अजूनही बंद
इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या जिल्ह्यात एकूण ८६६ शाळा आहेत. त्यापैकी ८५८ शाळा सुरू झाल्या असून ८ शाळा अजूनही बंद आहेत. दुसरीकडे २ लाख ३२ हजार ५८९ एकूण विद्यार्थींपैकी १ लाख १५ हजार ४२७ विद्यार्थी शाळेत दररोज हजेरी लावत आहेत. इतर विद्यार्थ्यांना संपूर्ण विषयांचे ऑनलाईन शिक्षण शिक्षकांकडून दिले जात आहे. पुढील टप्प्याला कधी सुरूवात होईल, याची प्रतीक्षा आहे.
८६६
जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकूण शाळा
८५८
सुरु असलेल्या शाळा
२३२५८९
एकूण विद्यार्थी
११५४२७
विद्यार्थ्यांची उपस्थिती