जळगावमधून 42 व्ॉगन मका पंजाब, काश्मीरला रवाना

By Admin | Updated: April 4, 2017 13:06 IST2017-04-04T13:06:10+5:302017-04-04T13:06:10+5:30

मक्याची आवक मोठय़ा प्रमाणात वाढल्याने जळगाव जिल्ह्यातील मका पंजाब, काश्मीरला पाठविला जात आहे. सोमवारी 42 व्ॉगन मका जळगाव रेल्वेस्थानकावरून पाठविण्यात आला.

42 vogan maa from Jalgaon leaves for Punjab, Kashmir | जळगावमधून 42 व्ॉगन मका पंजाब, काश्मीरला रवाना

जळगावमधून 42 व्ॉगन मका पंजाब, काश्मीरला रवाना

 जळगाव,दि.4- मक्याची आवक मोठय़ा प्रमाणात वाढल्याने जळगाव जिल्ह्यातील मका पंजाब, काश्मीरला पाठविला जात आहे. सोमवारी 42 व्ॉगन  मका जळगाव रेल्वेस्थानकावरून पाठविण्यात आला. यासाठी जिल्हाभरातून मका घेऊन आलेल्या ट्रकांची माल धक्क्यानजीक लांबच लांब रांग लागली होती. 

सध्या मका मोठय़ा प्रमाणात येत असून जिल्हाभरातून त्याची आवक वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हा मका देशातील विविध भागात पाठविला जात आहे. जळगाव रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावर आठवडाभरातून व्ॉगन भरल्या जात आहे. 
सोमवारी तर मका घेऊन आलेल्या ट्रकांची लांबलचक रांग लागून माल धक्का परिसरात अक्षरश: मालवाहू ट्रकचा वेढा पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. येथे आलेला माल एकेका ट्रकमधून खाली करून तो  बोगीत भरला जात होता. अशा प्रकारे पूर्ण 42 बोगी भरून जिल्ह्यातील हा मका पंजाब, काश्मीर येथे पाठविण्यात आला. 

Web Title: 42 vogan maa from Jalgaon leaves for Punjab, Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.