महाकाली भक्त परिवारातर्फे आयोजित शिबिरात ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST2021-06-25T04:13:24+5:302021-06-25T04:13:24+5:30
जळगाव- महाकाली भक्त परिवार व कलावंत सांस्कृतिक ग्रुपतर्फे वट पौर्णिमेनिमित्त आयाेजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्याम नगरात आमदार सुरेश भोळे, ...

महाकाली भक्त परिवारातर्फे आयोजित शिबिरात ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान
जळगाव- महाकाली भक्त परिवार व कलावंत सांस्कृतिक ग्रुपतर्फे वट पौर्णिमेनिमित्त आयाेजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्याम नगरात आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते झाले. या शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोनाचा कालावधी लक्षात घेता अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासतेय. परंतु, अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही समस्या लक्षात घेता शासन, प्रशासनातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करुन रक्त संकलनावर भर देण्याचे आवाहन सामाजिक, राजकीय संस्था, संघटना आदींना करण्यात येत आहे. त्यानुसार महाकाली भक्त परिवार व कलावंत सांस्कृतिक ग्रुपतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर, अखिल भारतीय लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष विनोद ढगे, रुपाली कोठावदे, माधुरी जाधव, शांतीलाल नावरकर, उद्धव कोठावदे, महाराष्ट्र कलावंत न्यायहक्क समितीचे महासचिव गणेश अमृतकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना रक्तदान केल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले. या उपक्रमासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अमीन सयानी यांनी केले. आभार भूषण अमृतकर यांनी मानले. यशस्वितेसाठी सुभाष सोनवणे, मधुकर अस्वार, विनोद लावणे, आकाश विभांडीक, प्रदीप योगी, मनोज शर्मा, किशोर अस्वार, भरत नागपुरे, डॉ.मनोहर जाधव, योगेश मिस्तरी, धनंजय जोशी, डॉ.प्रदीप कोठावदे, श्यामनगर परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.