शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात डेंग्यूने घेतला ४ वर्षांच्या बालिकेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 15:52 IST

जळगाव शहरातील शिवाजी नगरातील बालवाडीत असलेल्या जान्हवी प्रशांत पाटील या चार वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडल्याने शहरात खळबळ उडाली.

ठळक मुद्देमुलीच्या मृत्यूनंतर मनपा प्रशासनाला आली जागजान्हवीवर सकाळी ११ वाजता झाले अंत्यसंस्कारजळगावात ६० डेंग्यूसदृश रुग्ण आढळले

जळगाव : शहरातील शिवाजी नगरातील बालवाडीत असलेल्या जान्हवी प्रशांत पाटील या चार वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडल्याने शहरात खळबळ उडाली.दोन दिवसांपासून आजारी असलेल्या जान्हवीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी पहाटे ५ वाजता तिचा मृत्यू झाला. त्यानंतर जागे झालेल्या मनपा प्रशासनाकडून ८० कर्मचाऱ्याद्वारे शिवाजीनगर परिसरात अबेटिंग, फवारणी व धुरळणीच्या उपाययोजना करण्यात आल्या.डेंग्यूने पसरले हातपायगेल्या महिनाभरापासून शहरात डेंग्यूने पाय पसरायला सुरुवात केली आहे. भोईटेनगरातदेखील एका सात वर्षीय मुलाला डेंग्यू झाला होता. त्यानंतर मनपा प्रशासनाने केलेल्या पाहणीत २७ रुग्ण डेंग्यूसदृश आजाराने बाधित असल्याचे आढळून आले होते. मनपाने त्यापैकी दहा रुग्णांचे नमुने औरंगाबादला तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्यातदेखील ५ रुग्णांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले होते.जान्हवीवर सकाळी ११ वाजता झाले अंत्यसंस्कारजान्हवी ही बालवाडीत शिकत होती. गेल्या दोन दिवसांपासून ती आजारी होती. तिला जळगावातील खासगी रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असताना तिचा गुरुवारी पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. वडील प्रशांत पाटील हे विमा क्षेत्रात काम करतात, तर आई घरकाम करते. सकाळी ११ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.६० डेंग्यूसदृश रुग्ण आढळलेशहरात दिवसेंदिवस डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मलेरिया विभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणनुसार सुमारे ६० डेंग्यू संशयित तापाच्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती मलेरिया विभागाचे सुनील पांडे यांनी दिली. यामुळे डेंग्यूचा प्रश्न गंभीर होताना दिसून येत आहे. मनपाने खबरदारी म्हणून मनपाच्या प्रत्येक रुग्णालयात औषधीचा पुरवठा सुरू केला असून, अबेटिंग व फवारणीचे काम नियमित सुरू आहे. डेंग्यूमुळे गेल्या वर्षी शहरात १२ जणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Jalgaonजळगावdengueडेंग्यू