विषारी औषध सेवनाने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 20:57 IST2019-09-08T20:57:14+5:302019-09-08T20:57:19+5:30
अमळनेर : जवखेडा येथील प्रीती लक्ष्मण पाटील (वय १३) मूळ रा.बाळद, ता.भडगाव हिचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाला. ...

विषारी औषध सेवनाने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
अमळनेर : जवखेडा येथील प्रीती लक्ष्मण पाटील (वय १३) मूळ रा.बाळद, ता.भडगाव हिचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाला.
प्रीती घरात असताना तिने विषारी औषध सेवन केले. शेजारी राहणा?्या प्रकाश पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस पाटील उल्हास लांडगे यांना कळविले. त्यावेळी तिच्या तोंडातून फेस येत असल्याने दीपक पाटील, नगराज पाटील गिरधर पाटील यांच्या मदतीने तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी प्रकाश ताडे यांनी तिला मृत घोषित केले.
पोलीस पाटील उल्हास लांडगे यांच्या खबरीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक प्रशांत वाडीले करीत आहेत.