शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018 : जळगावात गणेशोत्सवात जगविली ३९ वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 12:42 IST

पर्यावरणपूरक उपक्रम

ठळक मुद्देभारती पर्यावरण प्रतिष्ठानच्यावतीने वृक्ष संवर्धनासह मेहरुण तलावाच्या स्वच्छतेसाठीही पुढाकारझाडांच्या संवर्धनासाठी पाठपुरावा

जळगाव : गणेशोत्सवात विविध उपक्रम राबविले जात असताना गेल्या तीन वर्षांपासून शहरातील भारती पर्यावरण प्रतिष्ठान ही संस्था पर्यावरण रक्षणासाठी धडपड करीत आहे. तीन वर्षात या संस्थेने गणेशोत्सावादरम्यान ३९ वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. इतकेच नव्हे तर मेहरुण तलावाच्या स्वच्छतेसाठी व पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्तींच्या स्थापनेचा प्रचार प्रचास करीत आहे.गणेशोत्सव म्हटला म्हणजे या काळात वेगवेगळ््या संस्थांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक म्हणून शहरातील भारती पर्यावरण प्रतिष्ठान ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे काम करीत आहे. विशेष म्हणजे हे काम केवळ गणेशोत्सवापूरताच मर्यादीत न ठेवता यासाठी संस्था बाराही महिने अखंडपणे काम करीत असते. यामध्ये तीन वर्षात संस्थेने अनेक ठिकाणी वृक्ष लागवड तर केलीच आहे, सोबतच गणेशोत्सवात ३९ वृक्षांची केवळ लागवडच न करता त्यांचे जतन करण्याचे काम केले आहे.सर्व झाडे जगलीसंस्थेच्यावतीने रामानंद नगर घाटामध्ये १९, द्वारकानगरमध्ये ११ तसेच महाबळमधील पशू चिकित्सलायनजीक ९ अशी कडूनिंब, वड, पिंपळ, गुलमोहर अशी विविध जातीचे ३९ झाडे लावली आहेत. या ठिकाणी केवळ झाडे लावून ती सोडून दिली नाही तर वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन त्यांचे जतन करण्याचे काम केल्याने ही सर्व वृक्ष जगली आहे. द्वारकानगरात ११ वृक्षांची लागवड केल्यानंतर तेथील रहिवाशांनी प्रेरणा घेऊन आणखी १० वृक्ष तेथे लावली, हे विशेष.झाडांच्या संवर्धनासाठी पाठपुरावाकेवळ वृक्ष लावण्यावरच न थांबता लावलेल्या वृक्षांच्या परिसरात अथवा इतर कोठेही वृक्षांना खिळे ठोकून जाहिरात लावलेली असल्यास त्या बाबत संबंधितांना सूचना देऊन ते काढण्यास सांगतात. त्यांनी न ऐकल्यास संस्था स्वत: या जाहिराती काढून झाडावरील खिळे काढून टाकते. यासोबतच झाडांच्या वाढीस कोठे अडथळा येत असल्यास ते दूर करण्याचेही काम संस्था करीत असते. यामुळे गणेशोत्सवात या ३९ झाडांसह इतरही अनेक झाडांचे संवर्धन यामुळे शक्य झाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.पर्यावरणास घातक मूर्तींचा वापर टाळाप्लॅस्टर आॅप पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणास धोका असल्याने त्या टाळून शाडू मातीच्या मूर्ती स्थापन करण्याचे आवाहन संस्थेमार्फत केले जाते. त्यात तीन वर्षात बरेच यश आले असून त्यामुळे अनेक जण शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करूलागल्याचेसांगण्यातआले.‘मी मेहरुण तलाव बोलतोय...’वृक्ष लागवड, पर्यावरणपूरक मूर्तींच्या स्थापनेचा प्रचार करण्यासह गणेश विसर्जनादरम्यान मेहरुण तलावाची होणारी अस्वच्छता याकडेही संस्थेने सामान्यांसह मनपाचेही लक्ष वेधले आहे. यासाठी संस्थेने ‘मी मेहरुण तलाव बोलतोय...’ अशी चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. याद्वारे तलावाची कशी अवस्था होत आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला असून त्याबाबत जागृत होण्याचा संदेश दिला जात आहे. ही चित्रफित मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनाही पाठविण्यात आली असून तलावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी संस्थेने केली आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड, पर्यावरणास घात ठरणाऱ्या मूर्तींचा वापर न करणे तसेच शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यासाठी संस्था तीन वर्षांपासून काम करीत आहे. यासाठी तरुण वर्गाने पुढे येणे गरजेचे आहे.- सुजाता देशपांडे, अध्यक्षा, भारती पर्यावरण प्रतिष्ठान.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Jalgaonजळगाव