दिल्लीहून बंगळुरूला जात होते, चाळीसगावला पकडले ६० कोटी रूपये किंमतीचे ३९ किलो केटामाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:43 IST2025-07-25T10:43:21+5:302025-07-25T10:43:30+5:30
एवढचा मोठ्या किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त होण्याची ही चाळीसगांव तालुक्यातील पहिली घटना आहे.

दिल्लीहून बंगळुरूला जात होते, चाळीसगावला पकडले ६० कोटी रूपये किंमतीचे ३९ किलो केटामाईन
संजय सोनार
चाळीसगाव (जळगाव) : -दिल्लीहून बंगलोरकडे जाणाऱ्या एका वाहनातून सुमारे ६० कोटी रुपये किंमतीचे ३९ किलो केटामाईन जप्त करण्यात आले. ही कारवाई २४रोजी रात्री उशिरा पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान चाळीसगावनजीक कन्नड घाटाच्या पायथ्याशी करण्यात आली. याप्रकरणी कार चालकास ताब्यात घेतले आहे.
एवढचा मोठ्या किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त होण्याची ही चाळीसगांव तालुक्यातील पहिली घटना आहे. धुळ्याकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या डी.एल.१ सी.बी.बी. ७७७१ या क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता या गाडीत अंमली पदार्थ (ड्रग्ज) बनविण्यासाठी वापरण्यात येणारे ३९ किलो केटामाईन मिळून आले.
ही गाडी दिल्लीहून इंदूरहून धुळे मार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे व पुढे बंगलोरकडे जाणार होती. या गाडीच्या संदर्भातली माहिती राज्य महामार्ग पोलिस अधिकारी सचिन सावंत यांना मिळाल्यानंतर त्यांनी घाट पायथ्याशी नाकाबंदी करून गाडी थांबवून तपासणी केली. त्यात वरील कारवाई करण्यात आली.