जीएमसीत ३५ बेड खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:16 IST2021-05-10T04:16:33+5:302021-05-10T04:16:33+5:30

सारीचे ११ मृत्यू जळगाव : जिल्ह्यात रविवारी सारी, कोविश संशयित अशा ११ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. शासकीय अहवालात या ...

35 beds below GM | जीएमसीत ३५ बेड खाली

जीएमसीत ३५ बेड खाली

सारीचे ११ मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात रविवारी सारी, कोविश संशयित अशा ११ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. शासकीय अहवालात या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून दहा पेक्षा अधिकच रोज मृत्यू होत असल्याने महिनाभरात तीनशेपेक्षा अधिक मृत्यू हे नोंदविण्यात आले आहेत. सारीने अधिक मृत्यू होत असल्याचे चित्र आहे.

१३ नवे रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात रविवारी बाहेरील जिल्ह्यातील १३ नव्या रुग्णांची नोंद करण्र्यात आली आहे. हे रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत ११ तर ॲन्टीजन चाचणीत २ बाधित रुग्ण समोर आले आहेत. ही संख्या १०८२ वर पोहोचली आहे. यातील ९५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उद्या स्थायीची सभा

जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेचे मंगळवारी दुपारी १ वाजता आयेाजन करण्यात आले आहे. कोरेानाच्या पाश्र्वभूमीवर ही सभा ऑनलाईन होणार आहे. यासह जलव्यवस्थापन समितीची सभो मंगळवारी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. दोनही सभा गाजण्याची चिन्हे आहेत.

Web Title: 35 beds below GM