हावडा मेलमधून लांबविलेले ४३ हजार रेल्वे पोलिसांनी केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:07 PM2020-01-13T23:07:04+5:302020-01-13T23:08:25+5:30

गाडी क्रमांक १२८०९ डाऊन मुंबई -हावडा मेलमधून चोरट्यांनी लांबविलेले ४३ हजार रुपये रेल्वे पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत प्रवाशाच्या ताब्यात दिले.

3,000 railway police pulled back from Howrah Mail | हावडा मेलमधून लांबविलेले ४३ हजार रेल्वे पोलिसांनी केले परत

हावडा मेलमधून लांबविलेले ४३ हजार रेल्वे पोलिसांनी केले परत

Next
ठळक मुद्देगेल्या महिन्यात झाली होती चोरीतपास पथकाने संशयितास घेतले ताब्यात

भुसावळ, जि.जळगाव : गाडी क्रमांक १२८०९ डाऊन मुंबई -हावडा मेलमधून चोरट्यांनी लांबविलेले ४३ हजार रुपये रेल्वे पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत प्रवाशांच्या ताब्यात दिले.
गेल्या महिन्यात २६ डिसेंबर रोजी बदरजहा मोहम्मद रफीक (वय ५५, रा.नागपूर) हे मुंबई हावडा मेलच्या कोच क्रमांक एस-४, सीट नंबर३३, ३६ वरून प्रवास करत होते. तेव्हा अज्ञात व्यक्तीने लेडीज पर्समधील ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने व साहित्य असा ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लांबविले होते. याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांना मिळालेली गुप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी सोपान भिवटे रा.खिरोडा, ता.संग्रामपूर, जि.बुलढाणा यास पथकातील एएसआय पौर्णिमा राखुंडे ,सुनील पाटील, मधुकर नाव्हकर यांनी ताब्यात घेतले. महिला प्रवासी बदरजहा यांचा मुद्देमाल कोर्टाच्या आदेशानंतर परत करण्यात आला.
दरम्यान, रेल्वे पोलिसांतर्फे सातत्याने कौतुकास्पद कामगिरी करून रेल्वेगाड्यातील चोऱ्यांमधील मुद्देमाल जलद गतीने तपास करून संबंधित प्रवाशांना ताब्यात दिला जात आहे.

Web Title: 3,000 railway police pulled back from Howrah Mail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.