सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवित ३० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:22 IST2018-04-28T22:22:57+5:302018-04-28T22:22:57+5:30
भडगाव तालुक्यातील सहा जणांकडून घेतले प्रत्येकी ५ लाख रुपये

सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवित ३० लाखांची फसवणूक
आॅनलाईन लोकमत
भडगाव,दि.२८ : नोकरीचे आमिष देऊन ६ जणांची ३० लाखात फसवणूक झाल्याची घटना तालुक्यातील वरखेड व भडगाव येथे घडली आहे. याबाबत भडगाव पोलिसात सुनील बाबूलाल पाटील (रा.वरखेड) यांच्या फिर्यादीवरून आरोपी हासुद्दीन चांदभाई शेख याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
फिर्यादी व साक्षीदार यांच्या मुलांना सैन्यात नोकरी लावून देतो असे सांगून प्रत्येक ५ लाख रुपये असे एकूण ३० लाख रुपये घेऊन नोकरी लावून देण्याच्या बाबत संशयित आरोपीने खोटे दस्तऐवज दिले. हा प्रकार लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पैसे परत मागितले असता आरोपीने उडवा उडवीचे उत्तरे दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आरोपी हासुद्दीन चांदभाई शेख (रा. बहिस्ता बंगला हनुमान नगर, दौड रोड जि.अहमदनगर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.