अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ३ वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:25 IST2019-02-05T23:24:46+5:302019-02-05T23:25:12+5:30
अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ३ वर्षांची शिक्षा
अमळनेर : चोपडा तालुक्यातील वडती येथे अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करणा-या जुबेद पिंजारी यास येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा ठोठावली असून चार वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षा व दंड ठोठावला.
९ आॅक्टोबर २०१६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जुबेद राजू पिंजारी हा आपल्या चुलत बहिणी सोबत नवरात्र उत्सव पाहून घराकडे पायी परतत असताना गावातील मारुती मंदिरा जवळ चौकापुढे अंधारामध्ये फिर्यादी सोळा वर्षीय तरुणीचा हात पकडून विनयभंग केला. त्यावेळी पीडित तरुणीने आरडाओरडा केल्याने पीडित तरुणीचा भाऊ दीपक कोळी हा त्या ठिकाणी आला होता. जुबेद पिंजारी याने दारूची बाटली दीपकच्या डोक्यात मारल्याने दीपक जखमी झाला होता.
सरकारी पक्षातर्फे अॅड. किशोर आर. बागूल यांनी काम पाहिले. त्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.
अति जिल्हा व सत्र न्या. राजीव पी. पांडे यांनी यावेळी जुबेद यास बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ८ प्रमाणे ३ वर्ष शिक्षा व १ हजार रुपये दंड व कलम १२ प्रमाणे १ वर्ष शिक्षा व एक हजार रु. दंड, भांदवी कलम ३२४ अन्वये दीपक यास जखमी केल्या प्रकरणी १ वर्ष शिक्षा व २ हजार रुपये दंड तर ३२३ प्रमाणे पीडित तरुणीशी हुज्जत घातल्याप्रकरणी ६ महिने अशी शिक्षा सुनावली आहे.