शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

जळगावात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:35 PM

१५ जुलैपूर्वी द्यावा लागणार अहवाल

ठळक मुद्दे एमसीआयकडून तयारीबाबत पत्रनिवासस्थानांच्या जागेचा होणार उपयोग

जळगाव : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षापाठोपाठ आता जळगावात द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या तयारीलादेखील सुरुवात झाली आहे. या बाबत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे (एमसीआय) जळगावातील वैद्यकीय महाविद्यालयास पत्र प्राप्त होऊन तयारीबाबत विचारणा करण्यात आली आहे. त्यानुसार १५ जुलैपूर्वी तयारीचा अहवाल परिषदेला पाठवायचा असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी दिली.जळगावात सुरू होणारे वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयातून सुरू करण्याविषयी एमसीआयकडे प्रस्ताव होता. त्यानुसार सर्व पूर्तता झाल्यानंतर एमसीआयने एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे आॅगस्ट २०१८ पासून जळगाव येथे अभ्यासक्रम सुरू होणार आहे.एमसीआयकडून विचारणाप्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुढील वर्षापासून द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करावा लागणार असल्याने त्या दृष्टीने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) जळगावातील वैद्यकीय महाविद्यालयास पत्र देऊन काय तयारी आहे, या बाबत विचारणी केली आहे. त्यानुसार द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहे.अधिष्ठातांनी घेतली मुंबईत भेटद्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी मुंबई येथे जाऊन वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक, सह संचालक, वैद्यकीय सचिव यांची भेट घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली.निवासस्थानांच्या जागेचा होणार उपयोगद्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी वाढीव मनुष्यबळही लागणार असून त्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार येथे वैद्यकीय अधिकारी व इतर जागा भरव्या लागणार आहे. तशी तयारीदेखील केली जात आहे. या सोबतच यंत्रसामुग्रीही, वर्गखोल्या व इतर खोल्या लागणार आहे. त्यासाठी रिकाम्या केलेल्या निवासस्थानाच्या जागांचा तसेच रक्तपेढी व इतर कक्षांच्यावरील जागांचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.दोन आठवड्यात पाठवावा लागणार अहवालएमसीआयच्या पत्रानुसार येथे तयारी सुरू झाली असून काय काय उपाययोजना केल्या गेल्या व केल्या जाणार आहे, याचा अहवाल आता १५ जुलैपूर्वी एमसीआयला पाठवावा लागणार आहे.द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत एमसीआयकडून पत्राद्वारे विचारणा करण्यात आली असून त्यादृष्टीने कामकाज केले जात आहे. १५ जुलैपूर्वी त्याचा अहवाल पाठवायचा आहे.- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव