भुसावळ वकील संघाच्या निवडणुकीसाठी २९ जणांचे उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 14:34 IST2019-01-27T14:32:56+5:302019-01-27T14:34:28+5:30

भुसावळ वकील संघाची निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध सात जागांसाठी २९ वकिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

29 nominations for Bhusawal advocacy team | भुसावळ वकील संघाच्या निवडणुकीसाठी २९ जणांचे उमेदवारी अर्ज

भुसावळ वकील संघाच्या निवडणुकीसाठी २९ जणांचे उमेदवारी अर्ज

ठळक मुद्दे८ फेब्रुवारी रोजी होणार निवडणूकउमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वकिलांची उडाली धावपळ

भुसावळ, जि.जळगाव : येथील वकील संघाची निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध सात जागांसाठी २९ वकिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवारी शेवटचा दिवस होता. त्यात अध्यक्षपदासाठी सर्व वकील सुनील पगारे, अशोक शिरसाठ, तुषार पाटील, मतीन अहमद, नरेंंद्रकुमार जैन, प्रकाश मोझे, उपाध्यक्ष पदाकरिता महेशचंद्र तिवारी, संतोष अढ़ाईगे, संजय चौधरी, विजय निंभोरे, कृष्णकुमारी सिंग, धनराज मगर, सुशील बर्गे, सचिव पदासाठी रम्मू पटेल विजय तायडे, जगदीश भालेराव, सहसचिव पदासाठी पुरुषोत्तम पाटील, नितीन सुरनासे, किशोरकुमार पाटील, अभिजित मेने, श्यामकांत चौधरी, महिला प्रतिनिधी पदाकरिता जास्वंदी भंडारी, निधी महाजन, कोषाध्यक्ष पदासाठी राजेश कोळी, सुशील बर्गे, योगेश वाणी यांनी तर ग्रंथपाल पदाकरिता संजय तेलगोटे, मुकेश चौधरी व योगेश वाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूपेश बाविस्कर, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विनोद तायडे, योगेश दलाल, धीरेंद्र पाल हे काम पाहात आहेत.

Web Title: 29 nominations for Bhusawal advocacy team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.