जळगावात मेडिकल दुकानातून २७ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 13:10 IST2019-05-21T13:10:19+5:302019-05-21T13:10:45+5:30
चोरी

जळगावात मेडिकल दुकानातून २७ हजार लंपास
जळगाव : शहरातील स्वातंत्र्य चौकातील एका मेडिकल दुकानात चोरी करीत चोरट्यांनी २७ हजार रुपये लंपास केले.
दुकानमालक नितीन भरत पाटील हे सोमवारी रात्री साडे नऊ वाजता दुकान बंद करून घरी गेले. मंगळवारी सकाळी दुकानावर आले त्या वेळी त्यांना दुकानाच शटर वाकलेले दिसले. त्या वेळी चोरी झाल्याचे उघड झाले.