चाळीसगावला २५ किलो गांजा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 17:22 IST2018-12-21T17:14:01+5:302018-12-21T17:22:10+5:30
पांढ-या रंगाच्या दुचाकीवरुन गोणीत गांजा घेऊन जाणा-या २६वर्षीय आरोपीला पोलिसांनी सापळा लावून त्याच्याकडील दुचाकीसह जेरबंद केले.

चाळीसगावला २५ किलो गांजा पकडला
चाळीसगावः पांढ-या रंगाच्या दुचाकीवरुन गोणीत गांजा घेऊन जाणा-या २६वर्षीय आरोपीला पोलिसांनी सापळा लावून त्याच्याकडील दुचाकीसह जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी पहाटे अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाने केली.
येथील टाकळी प्र.चा.शिवारातील खरजई रेल्वे गेट जवळ हर्षल हिंमत नन्नवरे (वय २६, रा. नारायणवाडी) हा दुचाकीवरुन (क्र. एम.एच १९/बीडब्ल्यु ३८८२) वरुन गांजा घेऊन जात असल्याची खबर पोलिस पथकाला लागली. पथकाने त्याला सापळा लावून जेरबंद केले. त्याच्याकडून गोणीत असलेला २५ हजार रुपये किंमतीचा ९ किलो कच्चा गांजा हस्तगत केला आहे. पो.काॕ. प्रभाकर पाटील यांच्या खबरीवरीन चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोनि रामेश्वर गाढे पाटील करीत आहे.