२४२ आराेग्य अधिकाऱ्यांना नियुक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST2020-12-12T04:33:41+5:302020-12-12T04:33:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फेब्रवारीत निवड झालेल्या २४२ सीएचओ कम्युनिटी हेल्थ ऑफीसर अर्थात सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांना शुक्रवारी जिल्ह्यात ...

242 Appointments to Health Officers | २४२ आराेग्य अधिकाऱ्यांना नियुक्त्या

२४२ आराेग्य अधिकाऱ्यांना नियुक्त्या

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : फेब्रवारीत निवड झालेल्या २४२ सीएचओ कम्युनिटी हेल्थ ऑफीसर अर्थात सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांना शुक्रवारी जिल्ह्यात विविध आरोग्य केंद्रांमध्ये नियुक्त्या देण्यात आल्या. या नियुक्त्यांसाठी जिल्हा परिषेदत शुक्रवारी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली.

यावेळी अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, सीईओ डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, आरोग्य उपसंचालकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी स्क्रीवर मार्गदर्शन करून या नियुक्त्या देण्यात आल्या. दरम्यान, काही डॉक्टरांनी याला विरोधही दर्शविला मात्र, इन कॅमेरा आणि मेरीटनुसार नियुक्त्या देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, फेब्रवारीतच ही प्रक्रीया राबविणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाची परिस्थीती बघता या डॉक्टरांना कोरोना काळातच सेवा देण्यात आली होती. अखेर शुक्रवारी ११ डिसेंबरला ही प्रक्रीया राबविण्यात आली.

Web Title: 242 Appointments to Health Officers