हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:01 IST2020-07-24T16:01:38+5:302020-07-24T16:01:57+5:30
तापी आणि पूर्णा नदीच्या उगम क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी एक वाजता हतनूर धरणाचे २४ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले.

हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले
भुसावळ, जि.जळगाव : तापी आणि पूर्णा नदीच्या उगम क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी एक वाजता हतनूर धरणाचे २४ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बºहाणपूर, देडतलाई, ट्क्सा यासह अन्य भागांमध्ये समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे सातत्याने दरवाजे उघडण्यात येत आहेत. २४ रोजी २४ दरवाजे उघडून तापी पात्रात विसर्ग सोडण्यात आले.
धरणाची जलपातळी २०९.५८० मीटर इतकी आहे तर जलसाठा १८१.६० एमएम क्यूब इतका आहे.