शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२२०० शाळांमध्ये शिजणार सुट्टीतही खिचडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 17:14 IST

शिक्षण विभागाने जारी केले निर्देश; शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर तर कारवाईचेही संकेत

ठळक मुद्दे शिक्षकांमध्ये मात्र सुट्टीतही शाळेत यावे लागणार असल्याने नाराजीचा सुर आहे.२६ जिल्ह्यातील ४० हजार २८८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सरसकट शाळांमध्ये ही योजना लागू करु नये. असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यात बहुतांशी भागात दुष्काळाने वेढा दिल्याने मे महिन्याच्या सुट्यांमध्ये शाळेत खिचडी शिजविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने जारी केले आहेत. जिल्ह्यातील २२०० शाळांमध्ये खिचडी शिजवली जाणार असून मुख्याध्यापकांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांमध्ये मात्र सुट्टीतही शाळेत यावे लागणार असल्याने नाराजीचा सुर आहे.

राज्यात यंदा भयावह दुष्काळाचे सावट आहे. २६ जिल्ह्यातील ४० हजार २८८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील २२०० शाळांमध्ये मुलांना मे महिन्याच्या सुट्टीत शिजवून पोषण आहार देण्याचे नियोजन आहे. याबाबत राज्य शासनाने परिपत्रक जारी केले आहे. 

चार तारखेपासून प्राथमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागत आहे. सुट्या १६ जून अखेर असतील. सुट्टीच्या कालावधीतही  मुलांना पोषण आहार दिला जाणार आहे. शासनाचा उद्देश चांगला असला तरी, मे महिन्यात मुले शाळेत येत नाही. पालकांना समज देऊनही ते मुले शाळेत पाठवित नाहीत. त्यामुळे योजनेला हरताळ फासण्याची शक्यताच अधिक आहे. पोषण आहार शिजवून तो वाया गेल्यास याला जबाबदार कोण ? असाही प्रश्नही उपस्थित होत आहे. ज्या भागात मुलांना दुष्काळात अन्न उपलब्ध होत नाही. तिथेच पोषण आहार देणे योग्य होईल. सरसकट शाळांमध्ये ही योजना लागू करु नये. असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.

तीन तास थांबावे लागणार

पोषण आहार शिजवण्यासह वाटपाचे नियोजन मुख्याध्यापकांना करावे लागणार आहे. यासाठी उपशिक्षकांना कामे देण्यात यावी. महिनावर नियोजनात प्रत्येक दिवशी शिक्षकांची ड्युटी असेल. संबंधित शिक्षकाने शाळेत  सकाळी सात वाजता उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बचत गटांकडून पोषण आहार शिजवायचा आहे. सकाळी ९ ते १० यावेळात पोषण आहाराचे वाटप करावयाचे आहे. 

हलगर्जीपणा केल्यास कारवाई

सुट्टीमध्ये पोषण आहार शिजवण्यासह मुलांना वाटप करण्यात हलगर्जीपणा झालास शिक्षकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी भरारी पथकेही नेमली गेली आहेत. दुष्काळात पोषण आहारापासून मुले वंचित राहू नये. यासाठी ही योजना आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना कार्यवाहीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. - बी.जे.पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, जळगाव.

 

टॅग्स :SchoolशाळाJalgaonजळगावChalisgaonचाळीसगावEducationशिक्षण