शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

202 फुकटय़ा प्रवाशांकडून दंड वसूल

By admin | Updated: March 24, 2017 00:33 IST

म्हसावद स्थानकावर रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम : एक लाख 67 हजार रुपये दंड वसूल

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी अचानक राबविण्यात आलेल्या मोठय़ा प्रमाणावरील तिकीट तपासणी मोहिमेत (बस रेड/अब्मुॅस चेक)  तब्बल 202 विना तिकीट प्रवाशांकडून 74 हजार 350 रुपये दंड वसूल करण्यात आला.  अचानक व बसने जाऊन राबविण्यात आलेल्या आणि तिकीट तपासणी मोहिमेमुळे रेल्वेने तिकीट न काढता फुकट प्रवास करणा:या प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी 7  ते दुपारी 3 वाजेर्पयत भुसावळ विभागातील म्हसावद  रेल्वेस्थानकावर पॅसेंजरसह जलद, अतिजलद मेल/ एक्स्प्रेस गाडय़ा  थांबवून पथकातील  रेल्वे कर्मचारी, अधिकारी यांनी प्रवाशांकडील तिकिटांची  तपासणी केली. ज्या प्रवाशांकडे प्रवासाचे तिकीट नव्हते त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करून त्यांना रितसर पावती देण्यात आली. तपासणी मोहिमेत 202 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून दंडासह 74 हजार 350  रुपये दंड वसूल करण्यात आला. शिवाय अनियमित प्रवास करणा:या 206 प्रवाशांकडून दंडासह 91 हजार 635 रुपये  वसूल करण्यात आले. रेल्वे प्रवास करताना सामान (लगेज) बूक न करता प्रवास करणा:या 2 प्रवाशांकडून  1 हजार 330 रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. भुसावळ  रेल्वे विभागातर्फे राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण 410 केसेस करण्यात आल्या. त्यातून  एक लाख 67 हजार 315 रुपये दंड वसूल करण्यात आला. भुसावळ येथून सकाळी सहा वाजता पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी म्हसावद स्थानक गाठले व सरळ तिकीट तपासणी सुरू केली. दरम्यान या तिकीट तपासणी मोहिमेत एकूण 408 केसेस करण्यात आल्या. त्यातून  एक लाख 67 हजार 315 रुपयांची वसुली करण्यात आली. मोहिमेत अनधिकृत व्हेंडर्स व विनातिकीट प्रवास करणा:यांकडून दंड वसूल करण्यात आला.  भुसावळ येथील रेल्वेचे अधिकारी, तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांचा ताफा भुसावळ येथून बसने थेट म्हसावद येथे धडकला आणि लागलीच सकाळी 6 वाजता मोहीम सुरू केली.तपासणीतील सहभाग  सुधीरकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक व्ही.पी.दहाट, सहायक वाणिज्य व्यवस्थापक  अजयकुमार,   तिकीट निरीक्षक बी. एस. तडवी, मुख्य निरीक्षक एच. एस. अहुवालिया यांच्या नेतृत्वाखाली 37 तिकीट तपासणी कर्मचारी, 30  आरपीएफ कर्मचारी मोठा असा ताफा तैनात होता.या गाडय़ांमध्ये झाली तपासणी  भुसावळ रेल्वे विभागातील म्हसावद रेल्वेस्थानकावर पथक सकाळी सहा वाजता दाखल होताच गाडी क्रमांक 51181 भुसावळ-देवळाली शटल,11039 महाराष्ट्र एक्स्प्रेस, 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर, 12165 वाराणसी एक्स्प्रेस, 12799 गोवा एक्स्प्रेस, 12859 गीतांजली एक्स्प्रेस, 15018-15017  काशी एक्स्प्रेस, 12741 वास्को-पटना  एक्स्प्रेस या गाडय़ांमध्ये तिकीट तपासणी केली.प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोहीम.. भुसावळ येथून तिकीट तपासणी पथक बसने म्हसावद येथे दाखल झाले. बसमधून उतरताच वाणिज्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी यांनी  प्रवासी गाडय़ांची तपासणी केली. भुसावळ विभागातर्फे  नियमित अशा पद्धतीने बसने जाऊन तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या पुढेही अशाच पद्धतीने तिकीट तपासणी मोहीम राबविण्यावर भर राहील. प्रवासी संख्या वाढीसाठी अशी मोहीम राबविली जाते, असे सांगण्यात आले आहे.यातून महसूलही वाढतो, असे सुनील मिश्रा यांनी सांगितले.आजच्यासारखीच तिकीट तपासणी मोहीम यापुढेही विभागात ठिकठिकाणी राबविण्यात येईल. प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करणे टाळावे. अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा. विनातिकीट प्रवास करताना आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.- सुनील मिश्रा, वरिष्ठ  विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, डीआरएम कार्यालय, भुसावळ.