जळगावातील वीज चोर ग्राहकांना 2 लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 17:56 IST2017-04-02T17:56:57+5:302017-04-02T17:56:57+5:30
महावितरण कंपनीच्या फिरत्या पथकातर्फे वीजचोरांवर कारवाईची मोहिम राबविण्यात येत आह़े 1 लाख 94 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली आह़े

जळगावातील वीज चोर ग्राहकांना 2 लाखाचा दंड
महावितरणच्या फिरत्या पथकाची कारवाई : दंड न भरल्यास गुन्हा दाखल
जळगाव,दि.2- महावितरण कंपनीच्या फिरत्या पथकातर्फे वीजचोरांवर कारवाईची मोहिम राबविण्यात येत आह़े मीटरमध्ये फेरफार केल्याने शनिवारी रामनगर, अयोध्यानगर, रामेश्वर कॉलनी येथील घरगुती व व्यावसायिक वीजचोरांचे मीटर जप्त करण्यात आले असून 1 लाख 94 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली आह़े
मीटरमध्ये फेरफार केल्याने तसेच दुस:याला स्वत:च्या मीटरवरून वीजकनेक्शन दिले या दोन्ही बाबींसाठी अनुक्रमे कलम 135 तसेच कलम 126 प्रमाणे उषा लोखंडे, शेख अमजद शेख चाँद, सागर आनंदा पाटील, राजेंद्र दयाराम पाटील, वामन चौधरी, किशोर वसंत चोपडे, सय्यद अशफाक सैय्यद या सात जणांवर शासनाने या ग्राहकांवर एकूण 1 लाख 94 हजार 70 रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली़ संबंधितांना दंडाची रक्कम भरण्यासाठी मंगळवार्पयत दोन दिवसाची मुदत देण्यात आली आह़े यानंतर नाशिक येथील महावितरण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आह़े