शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

एरंडोल तालुक्यात १६६ कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 11:35 IST

अंगणवाडी केंद्रात कुपोषणमुक्तीसाठी अंडी, खजुरांचा पूरक आहार

ठळक मुद्देएरंडोल तालुक्यातील ११ हजार ८५० बालकांचे घेतले वजनएरंडोल तालुक्यात साधारण श्रेणीचे १० हजार ५९३ बालकएरंडोल तालुक्यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या १०९१

आॅनलाईन लोकमतएरंडोल,दि.६ : शासनाकडून कुपोषणमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असतातना एरंडोल तालुक्यात एकूण १२ हजार १५७ बालके असून, त्यापैकी १६६ तीव्र कुपोषित बालके आहेत. त्यांना अंडी व खजुराचा पूरक आहार अंगणवाडी केंद्रामार्फत पुरविण्यात येत आहे.एरंडोल तालुक्यात वजन घेतलेल्या बालकांची संख्या ११ हजार ८५० आहे. त्यात साधारण श्रेणीचे १० हजार ५९३ बालके आहेत, तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या १०९१ आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये तीव्र कुपोषित बालके १७४ व नोव्हेंबर २०१७ मध्ये १६६ बालके तीव्र कुपोषित आहेत.पद्मालय येथे परसबाग लावल्यामुळे बालकांना रोजच्या आहारात पालेभाज्या व फळभाज्या खाऊ घातल्या जात आहेत. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून तेथे कुपोषण नाही. याशिवाय ताडे, उत्राण गु.ह., वैजनाथ, खेडी खुर्द येथील अंगणवाड्या कुपोषणमुक्त झाल्या आहेत.पावसाळ्यात यावर्षी पद्मालय पॅटर्न वापरून तालुक्यात ४० अंगणवाड्यांमध्ये परसबाग लावण्यात आल्या. मात्र पाण्याअभावी सदर उपक्रम यशस्वी झाला नाही. ग्रामसेवकांचे सहकार्य घेऊन परसबागेसाठी पाण्याचे नियोजन केले तर परसबागेच्या माध्यमातून संपूर्ण तालुका मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 कुपोषित असलेल्या बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केला जात आहे. त्यामुळे कुपोषणावर नियंत्रण करणे शक्य होणार आहे.जयबून तडवी, प्रभारी प्रकल्पाधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, एरंडोल

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोल