सर्पदंशाने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2023 11:48 IST2023-06-18T11:47:33+5:302023-06-18T11:48:20+5:30

त्याच्या पश्चात  वडील,  भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

16 year old boy dies of snakebite in chopda jalgaon | सर्पदंशाने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

सर्पदंशाने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

शाम जाधव, चोपडा (जि.जळगाव):चोपडा तालुक्यातील पिंपरपाडा या आदिवासी पाड्यातील १६ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला.  ही घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. 

 पिंपरपाडा येथील ८ वीत  शिकणारा लखीराम सिताराम बारेला ( १६ ) हा सकाळी झोपेतून उठून लघुशंकेसाठी घराबाहेर आला असता विषारी सापाने त्याला दंश केला.  प्रकृती बिघडल्याने त्याला चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.  तिथे  डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  लखीराम हा हिंगणवाडे आश्रमशाळेत इयत्ता ८ वीत शिकत होता. त्याच्या पश्चात  वडील,  भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

Web Title: 16 year old boy dies of snakebite in chopda jalgaon