शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

कोर्ट चौकातून 16 लाखांचे मोबाईल लंपास

By admin | Updated: April 8, 2017 00:46 IST

कोर्ट चौकातील जे.टी.चेंबरमधील वायरलेस वल्र्ड या मोबाईल दुकानातून 16 लाख 37 हजार 500 रुपयांचे 114 नवीन मोबाईल लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

जळगाव- शहरातील अत्यंत वर्दळीच्या कोर्ट चौकातील जे.टी.चेंबरमधील वायरलेस वल्र्ड या मोबाईल दुकानातून 16 लाख 37 हजार 500 रुपयांचे  114 नवीन मोबाईल लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी  उघडकीस आली. गुरुवारी रात्री 12 ते 2़13 वाजेर्पयत एका अल्पवयीन चोरटय़ाने पूर्ण दुकान साफ केले. तो चोरटा दुकानातील सीसीटीव्ही कॅमे:यात कैद झाला आह़े त्याच्या शोधासाठी चार पथके तयार करण्यात आली असून ती रवाना झाली आहेत. चोरटा जिल्हाबाहेरील असल्याचा पोलिसांना संशय आहे. रात्रंदिवस वर्दळ असलेल्या या चौकातून चोरटे चोरी करीत असल्याने त्यांना पोलिसांची कोणतीही भीती नसल्याचे या घटनेवरुन सिद्ध होते. ‘सीसीटीव्ही’मुळे चोरटय़ाने           तोंडाला बांधला रूमालराजेंद्र बारी यांच्या मोबाईल दुकानातील आतील भागात तीन सीसीटीव्ही कॅमेरे आह़े यातील प्रत्येक कॅमे:यात चोरटा व चोरीचा प्रकार कैद झाला आह़े चोरटय़ाने रात्री 11़57 ला दुकानात प्रवेश केला़ तो अल्पवयीन असल्याचे कॅमे:यात दिसत आहे. त्याने सोबत एक मोठी पांढरी पिशवी तसेच स्क्रू ड्रायव्हर, कटर, बॅटरी हे साहित्य आणले होत़े सीसीटीव्ही कॅमे:यात चेहरा दिसू नये व ओळख पटू नये म्हणून चोरटय़ाने तोंडाला रूमाल बांधला होता.कटरने सील कापून फक्त           नवीन 114 मोबाईल लांबविलेचोरटय़ाने सर्व दुकानात पाहणी केली़ मोबाईल असलेल्या ठिकाणी जाऊन सोबतच्या कटरने सील कापले व मोबाईल ताब्यात घेतले.  सव्वा दोन तासात दुकानातील विविध कंपन्यांचे प्रत्येकी 20 ते 25 हजार रुपये किमतीचे असे दुकानातील सर्व नवीन 114 मोबाईल लांबविल़े सर्व मोबाईलचे खोके दुकानात पडलेले होत़े पहाटे 2़14 वाजता चोरटय़ाने पुन्हा शटर वाकवून हातातील पिशवी बाहेर फेकली व तो बाहेर पडला़चोरटय़ाचे भ्रमणध्वनीवर संभाषणचोरी करत असताना चोरटा तीन ते चार वेळा त्याच्याजवळील मोबाईलवरून त्याने कुणाशी तरी संभाषण केल़े 12 वाजता  चोरटय़ाने फोन केला़ यानंतर 1़25 वाजता आणि  बाहेर पडताना फोन केला़. तो बाहेरील कुण्या व्यक्तीकडून  दुकानातील साहित्याची माहिती घेत असावा असा  पोलिसांना संशय आह़े त्यादृष्टीनेही तपास सुरु आहे. मोक्षदा पाटील यांनी दुकानादाराकडून माहिती जाणून घेतली़ तसेच येत्या दहा दिवसात दुकानात आलेल्या प्रत्येकाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना पोलीस निरीक्षकांना               दिल्या.सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून येत असलेला चोरटा अस्पष्ट दिसत आह़े त्याचे स्पष्ट छायाचित्र तयार करण्याचे काम सुरू आह़े घटनेच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह कर्मचा:यांची चार पथके तयार केली आह़े तसेच परिसरातील इतर ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याच्या सूचना केल्या आहेत़ रेकार्डवरील गुन्हेगारांचीही माहिती काढण्यात येत असून लवकरच हा गुन्हा उघडकीस आणू़ - डॉ़ जालिंदर सुपेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक़ज्या पध्दतीने या घटनेत चोरी केली आहे, त्याच पध्दतीने जिल्ह्यात इतर घटना घडल्या आहेत काय?त्याचा अभ्यास करण्यात येईल़ इतर जिल्ह्यांमध्ये संपर्क साधण्यात येईल़ दुकानात  कोणआले, कोण गेले त्याची माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना केल्या आहेत़ लवकरच चोरटय़ास अटक करण्यात येईल.-मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक़