जळगाव जिल्ह्यात ५७३ ग्रामपंचायसाठी १५,२०० अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 23:43 IST2020-12-30T23:43:15+5:302020-12-30T23:43:35+5:30
तीन तालुक्यातील आकडेवारीला उशीर जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी जिल्ह्यात ५७३ ग्रामपंचायसाठी १५,२०० अर्ज ...

जळगाव जिल्ह्यात ५७३ ग्रामपंचायसाठी १५,२०० अर्ज दाखल
तीन तालुक्यातील आकडेवारीला उशीर जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी जिल्ह्यात ५७३ ग्रामपंचायसाठी १५,२०० अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील धरणगाव, अमळनेर, पाचोरा या तालुक्यातील २१० ग्रामपंचायतींची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. ७८३ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५,२०० अर्ज दाखल असून शेवटच्या दिवशी मोठी गर्दी झाली होती. दाखल अर्जांची ३१ डिसेंबर रोजी छाननी होणार असून ४ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. जळगाव तालुक्यातील सर्व ४३ ग्रामपंचायतींसाठी सर्वच प्रभागातून एकापेक्षा जास्त अर्ज दाखल असल्याने कोठे बिनविरोध होईल, हे माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. रात्रीपर्यंत प्रक्रिया सुरू उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने सर्व नोंदींसाठी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. त्यात शेवटच्या दिवशी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांची ऑनलाईनला नोंद करणे व तक्ता तयार करणे यात बराच वेळ गेला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडेही आकडेवारी येण्यास बराच वेळ लागत होता. छाननी - ३१ डिसेंबर अर्ज माघारी, चिन्हवाटप - ४ जानेवारी २०२१ मतदान - १५ जानेवारी