शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘अंतर्नाद’च्या शाडूची गणेश मूर्ती बनवा कार्यशाळेत १४०० गणेशप्रेमींचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 22:32 IST

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे झूम अ‍ॅपच्या माध्यमातून शाडू मातीची गणेशमूर्ती बनवा कार्यशाळा मंगळवारी घेण्यात आली.

ठळक मुद्देआकर्षक मूर्ती साकारणाऱ्या पाच स्पर्धकांना गौरविणारमूर्तीकलेचा प्रचार-प्रसार२१ पर्यंत पाठवायचे आहे दोन फोटो

भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे झूम अ‍ॅपच्या माध्यमातून शाडू मातीची गणेशमूर्ती बनवा कार्यशाळा मंगळवारी घेण्यात आली. त्यात विविध प्रकारची सोशल माध्यमे वापरून १४०० पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांनी सहभाग घेतला. मूर्तिकार रमाकांत भालेराव यांनी तंत्रशुद्ध शैलीत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ज्ञानेश्वर घुले यांनी, तर सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले. तांत्रिक बाजू योगेश इंगळे, अमित चौधरी यांनी सांभाळली. १० वर्षे ते ७० वर्षे वयोगट सहभागी झाला. रमाकांत भालेराव यांनी शाडूमातीच्या गणरायाची मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक आॅनलाइन सादर करून संवादही साधला. अनेकांनी या कार्यशाळेचा लाभ घेत असतानाच आकर्षक गणरायाच्या मूर्ती साकारल्या. जास्तीत जास्त गणेशभक्तांनी मातीच्या मूर्तींची स्थापना करावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. ज्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला त्यांनी येत्या २१ आॅगस्टपर्यंत मूर्ती बनवतानाचा व रंगकाम झाल्यानंतरच्या मूर्तीचा एक असे दोन फोटो प्रतिष्ठानच्या समन्वय समितीकडे पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अध्यक्ष संदीप पाटील, प्रकल्पप्रमुख ज्ञानेश्वर घुले, प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील, सहसमन्वयक सचिन पाटील यांनी आयोजन, नियोजनाची जबाबदारी पार पाडली. उपक्रम समिती सदस्य योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, जीवन महाजन, देव सरकटे, जीवन सपकाळे, विक्रांत चौधरी, हरीश कोल्हे, मिलिंद कोल्हे, अमित चौधरी, समाधान जाधव, संदीप सपकाळे, राजू वारके, भूषण झोपे, प्रा. श्याम दुसाने यांनी परिश्रम घेतले.उपक्रमाचे नवे व्यासपीठशाडूच्या मातीपासून आकर्षक मूर्ती साकारणाºया पाच स्पर्धकांना पारितोषिके, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची चळवळ या माध्यमातून उभी राहील. आॅनलाइन कार्यशाळेला जो प्रतिसाद मिळाला तो उत्साह वाढवणारा आहे, असे अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील म्हणाले.मूर्तीकलेचा प्रचार-प्रसारशाडूमातीची मूर्ती बनविण्याचा आनंद शब्दातीत असतो. या मूर्तीचे विसर्जन पाण्यात लवकर होते. अर्थात, उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहते. मूर्तीकलेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आॅनलाइन कार्यशाळा उपक्रम पथदर्शी ठरेल, असे गौरवोद्गार प्रशिक्षक रमाकांत भालेराव यांनी काढले.

टॅग्स :artकलाBhusawalभुसावळ