पूरामुळे सर्व मार्ग बंद; उपचारासाठी नेण्यासाठी नदीवर आणले, पण १३ वर्षीय बालिकेने प्राण सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 10:34 IST2021-09-07T10:34:18+5:302021-09-07T10:34:18+5:30

जळगावमधील बोरी नदीला पूर आलेल्याने येण्या-जाण्यास दूसरा रस्ता अथवा पूल नाही.

A 13-year-old girl from Jalgaon has died as she was not taken to hospital for treatment. | पूरामुळे सर्व मार्ग बंद; उपचारासाठी नेण्यासाठी नदीवर आणले, पण १३ वर्षीय बालिकेने प्राण सोडले

पूरामुळे सर्व मार्ग बंद; उपचारासाठी नेण्यासाठी नदीवर आणले, पण १३ वर्षीय बालिकेने प्राण सोडले

जळगाव : बोरी नदीला पूर आलेल्याने येण्या-जाण्यास दूसरा रस्ता अथवा पूल नाही. याचवेळी गावातील १३ वर्षाची मुलगी तापाने फणफणत होती. मात्र मार्ग बंद असल्याने उपचारासाठी तिला रुग्णालयात घेऊन जाता आले नाही. गावातही डॉक्टर नाही. अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारसाठी नेण्यासाठी नदी काठावर आणले. पण दुर्दैवाने तिथेच नदीकाठी त्या निष्पाप बालिकेचा मृत्यू झाला. आदिवासी आरुषीचा करूण अंत झाल्याने संपूर्ण गाव हळहळला. 

तालुक्यातील सात्री येथे आरुषी सुरेश भिल ( १३ ) आसे या मृत मुलीचे नाव आहे. आरुषी ही तापाने आजारी होती. मात्र बोरी नदीला पूर आलेला आणि वर्षानुवर्षे हे गाव पूल नसल्याने जीव धोक्यात घालून नदी ओलांडत असत. मात्र पूर जास्त असल्याने मुलीला दवाखान्यात नेता आले नाही तर डॉक्टरला गावात येता येत नाही. मंगळवारी  सकाळी मुलीचा ताप वाढला अस्वस्थ झाल्याने कसे तरी तिला खाटेवर टाकून नदी ओलांडू म्हणून नदी काठावर आले. मात्र   दुर्दैव आड आले तिचा झटका येऊन तेथेच मृत्यू झाला. तरी लाडकी लेक वाचावी म्हणून चार पाच लोकांनी मोटरसायकलचे ट्यूब टाकून स्वतःच जीव धोक्यात टाकून  बोरी नदी पार केली मात्र तिला दवाखाण्यात डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले.

सात्री गाव निम्न तापी प्रकल्पात पुनर्वसित गाव आहे. आठ वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे गावातून बाहेर निघायला जागा नाही दोनच दिवसांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी , पुनर्वसन अधिकारी नव्या  पुनर्वसित गावठाणाला भेट देऊन गेले त्यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी गावात व्हायरल तापाचे रुग्ण आहेत दवाखाण्यात कसे नेऊ आम्ही जगावे की मरावे असा संतप्त सवाल केला होता. मात्र निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही.  गावात डॉक्टर पाठवले नाही किंवा गावात जायला आपत्ती व्यवस्थापनाची बोट देखील पाठवली नाही. 

आज एका मुलीचा अंत झाला आहे. आणखी किती बळी प्रशासन घेणार? दोन दिवसांपूर्वी आदिवासी बांधवांना घरपोच देण्यात येणारी खावटी देखील त्यांना नदीतून जाऊन डांगरी येथून आणावी लागली होती. याबाबत लोकमतने प्रकाश झोत टाकला होता.  एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना गावासाठी पूल नाही आणि गावात जायला रस्ता नाही यापेक्षा विदारक चित्र काय असावे.

Web Title: A 13-year-old girl from Jalgaon has died as she was not taken to hospital for treatment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.