शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबाद उड्डाणपुलावर अपघात, १३ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 14:05 IST

फैजपूर येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात बकरी खरेदी-विक्री केली जाते. याच व्यवसायासाठी भडगाव येथून एम. एच.-४३ बीबी ००५० आणि जामनेर तालुक्यातील पळासखेडा (मीराचे) येथून एम. एच.-४३ एडी १०५१ ही दोन्ही मालवाहतूक वाहने फैजपूरकडे जात होती.

जळगाव / नशिराबाद : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे आठवडे बाजारासाठी बकऱ्या घेऊन जाणाऱ्या दोन मालवाहू वाहनांना भुसावळकडून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करताना समोरून जोरदार धडक दिल्याने चार जण नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलावरून खाली पडल्याने जागीच ठार झाल्याची भीषण घटना बुधवारी पहाटे ६.५० वाजण्याच्या सुमारास घडली, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.फैजपूर येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात बकरी खरेदी-विक्री केली जाते. याच व्यवसायासाठी भडगाव येथून एम. एच.-४३ बीबी ००५० आणि जामनेर तालुक्यातील पळासखेडा (मीराचे) येथून एम. एच.-४३ एडी १०५१ ही दोन्ही मालवाहतूक वाहने फैजपूरकडे जात होती. या दोन्ही वाहनांमध्ये १५ जण सहा ते सात बकऱ्यांसह प्रवास करीत होते.  या वेळी  भुसावळकडून येणाऱ्या  ट्रकने कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता समोरून येणाऱ्या दोन्ही मालवाहतूक वाहनांना धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की मालवाहतूक वाहनामधील अकील गुलाब खाटीक (४०, रा. फैजपूर), नईम अब्दुल रहिम खाटीक (६२, रा. बिलाल चौक, तांबापूरा), फारूख मजीद खाटीक (४२, रा. भडगाव), जुनेद सलीम खाटीक (१८, रा. भडगाव) हे उड्डाणपुलाच्या खाली फेकले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर १३ जण गंभीर जखमी झाले. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस