जळगावच्या भंगार बाजारातून 12 संशयास्पद दुचाकी जप्त
By Admin | Updated: April 20, 2017 17:22 IST2017-04-20T17:22:28+5:302017-04-20T17:22:28+5:30
पोलिसांचे धाडसत्र : चोरीच्या वाहनांची तोडफोड होत असल्याचा संशय

जळगावच्या भंगार बाजारातून 12 संशयास्पद दुचाकी जप्त
जळगाव,दि.20- अजिंठा चौक व परिसरातील भंगार बाजारात गुरुवारी पोलिसांनी अचानक धाडसत्र राबविल्याने अवैध व्यवसाय करणा:यांचे धाबे दणाणले आहे. या बाजारात जिल्हा तसेच बाहेरगावावरुन चोरुन आणलेल्या ट्रक, कार यासह अन्य वाहनांची विल्हेवाट लावली जात असल्याच्या संशयावरून अचानक भंगार तपासणी मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, संशयास्पदरीत्या भंगारात आढळून आलेल्या 12 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
भंगार दुकानात असलेले वाहनांचे स्पेअर पार्ट, त्याचा चेचीस क्रमांक व कागदपत्र याची तपासणी केली. कागदपत्र व उपलब्ध साहित्य याचा ताळमेळ न बसणारे साहित्य जप्त करण्यात येणार असून ते चोरीचे समजून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.