‘केटामाईन’च्या 47 गोण्यांसह 12 आरोपी न्यायालयात

By Admin | Updated: July 1, 2017 18:00 IST2017-07-01T18:00:01+5:302017-07-01T18:00:01+5:30

पंचाला दाखविला मुद्देमाल : भुसावळलाही केली न्यायालयाने पाहणी

12 accused in 47 cases of 'Katimaine' in court | ‘केटामाईन’च्या 47 गोण्यांसह 12 आरोपी न्यायालयात

‘केटामाईन’च्या 47 गोण्यांसह 12 आरोपी न्यायालयात

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.1 - केटामाईन प्रकरणात शनिवारी न्यायालयात सर्व 12 आरोपींसह केटामाईनच्या 47 गोण्या आणण्यात आल्या होत्या. या गुन्ह्यातील पंच असलेले प्रल्हाद महाजन (रा.जळगाव) यांची सरतपासणी पूर्ण झाली. त्यानंतर त्यांना केटामाईन दाखविण्यात आले. एका चार चाकी वाहनातून या 47 गोण्या न्यायालयात आणण्यात आल्या. 
न्या.के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे. पोलीस बंदोबस्तात केटामाईन व आरोपींना आणण्यात आले होते. दुपारी कामकाज झाल्यानंतर आरोपींची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, चौकशी समितीचे प्रमुख न्या.ए.एस.कुळकर्णी पंच प्रल्हाद महाजन, अॅड.राशीद पिंजारी, अॅड.हिंमत सूर्यवंशी, अॅड.प्रवीण पांडे यांनी शुक्रवारी भुसावळ येथे भेट दिली. या गुन्ह्यात जप्त केलेल्या तीन कार खडका चौकातील गोदामात  ठेवण्यात आल्या आहेत. तेथे पंचाला कार दाखविण्यात आल्या व तेथेच त्यांची अॅड.हिंमत सूर्यवंशी यांनी उलटतपासणी घेतली.

Web Title: 12 accused in 47 cases of 'Katimaine' in court