ममुराबादच्या १०६ ग्रामस्थांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:16 IST2021-04-09T04:16:38+5:302021-04-09T04:16:38+5:30
सहा रुग्ण : ग्रामपंचायतीकडून औषध फवारणीला वेग लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य ...

ममुराबादच्या १०६ ग्रामस्थांचे
सहा रुग्ण : ग्रामपंचायतीकडून औषध फवारणीला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सुरू करण्यात आलेल्या कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत ममुराबादच्या १०६ ग्रामस्थांनी आतापर्यंत लस घेतली आहे. गावात सध्या ६ कोरोना बाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ग्रामपंचायतीकडूनही जंतुनाशकाच्या फवारणीवर भर देण्यात आला आहे.
धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ममुराबाद उपकेंद्राच्या आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून प्रतिबंधित क्षेत्रावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. घरोघरी जाऊन बारकाईने सर्वेक्षण केले जात आहे. त्यानुसार ७७८ ग्रामस्थांचे स्क्रिनिंग आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठीच्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना घराबाहेर पडल्यावर मास्क वापरण्यासह योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय बाधित व अबाधित भागात जंतुनाशकाची फवारणी वाढविण्यात आली आहे. सरपंच हेमंत चौधरी हे स्वतः त्या कामावर लक्ष ठेवून आहेत.