भुसावळात १०० वर्षे जुना रेल्वे पादचारी पूल जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 18:44 IST2020-05-10T18:42:49+5:302020-05-10T18:44:53+5:30
रेल्वेस्थानकावरील १०० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पादचारी पूल रविवारी जमीनदोस्त करण्यात आला.

भुसावळात १०० वर्षे जुना रेल्वे पादचारी पूल जमीनदोस्त
भुसावळ, जि.जळगाव : रेल्वेस्थानकावरील दुसºया टप्प्यात तब्बल १०० वर्षे जुना ब्रिटिशकालीन ३५ मीटर लांबीचा पादचारी पूल रविवारी जमीनदोस्त करण्यात आला.
गेल्या वर्षी मुंबई येथील जीर्ण झालेला रेल्वे पूल कोसळल्यानंतर मोठी दुर्घटना झाली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे भुसावळ रेल्वे प्रशासन सतर्क होऊन ब्रिटिशकालीन १०० वर्षांपूर्वीचा फलाट क्रमांक एक व दोनवरील पादचारी पूल एप्रिल २०१९ ला पहिला टप्प्या अंतर्गत काढण्यात आला होता. त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर दुसºया टप्प्यात ११० मीटर लांबीच्या पुलातील ३५ मीटरचा फलाट क्रमांक ४-५ ला जोडणारा पादचारी पूल रेल्वेच्या १४० टन क्षमतेचा महाबली ट्रेनद्वारे काढण्यात आला. पुलास काढण्यासाठी तब्बल पाच तासाचा अवधी लागला.
जुन्या ११० मीटर लांबीच्या पुलाची निर्मिती सन १९११ ला करण्यात आली होती. यानंतर सन १९२७ व १९६३ ला पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती.
जुन्या पुलाची रुंदी ३.५ मीटर होती. नवीन पुलाची रुंदी पाच मीटर राहणार आहे.
डी.आर.एम. विवेककुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकऱ्यांच्या देखरेखीखाली पुलाचा ढाचा काढण्यात आला.