शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

जळगावात सीबीएसईत ९ शाळांचा १०० टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 12:10 IST

समाजशास्त्रात सहा जण अव्वल

जळगाव : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. दरवर्षी दुपारी तीन वाजता जाहीर होणारा निकाल मात्र यंदा अर्धा तास आधीच लागला़ यंदा सेंट जोसेफ सीबीएसई स्कूलचा आर्यन राजेश जैन हा विद्यार्थी ९९़२ टक्के गुण मिळवून शहरातून चमकला आहे़ शहर व परिसरातील सीबीएसईच्या सर्वच्या सर्व नऊ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा सेंट जोसेफ सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्याने सर्वाधिक गुण मिळवून शहरातून बाजी मारली़ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह पालकांनी निकाल पाहिल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला़सायंकाळी अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या गुणांची माहिती एकमेकांकडू जाणून घेण्यासाठी शाळांजवळ गर्दी केली होती़ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकून येत होता़ शहरातून ९९़२ टक्के गुण मिळविल्याने आर्यन याचा वडील डॉ़ राजेश जैन व आई डॉ़ वैशाली जैन यांनी पेढा भरवून आनंद साजरा केला़सेंट जोसेफच्या आर्यनची बाजीसेंट जोसेफ सीबीएसई स्कूलच्या आर्यन राजेश जैन या विद्यार्थ्याने ९९़२ टक्के गुण मिळवून शहरातून तसेच शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे़ तसेच शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे़ शाळेतून रूचा चौधरी ही ९८़६ टक्के मिळवून द्वितीय तर हिमांशू सादुलवाड या विद्यार्थ्यांने ९८़४ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे़ हर्षीता जाजू, संभव सूर्यवंशी ९८, अमेय देशमुख, यश भंडारी ९७़८, दर्शन कवाळे, सुनय पाटील ९७़६,आयुषी बोरोले ९७़२, ओम ढाके, सानिका कोतकररिया पाटील ९७़६, नकुल कोल्हे, राजसिंग जयदीपसिंग छाबरा ९६़५ तसेच दिव्यकुमार सुरेश आदीवाल ९५़६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत़ शाळेच्या २४ विद्यार्थ्यांना ९६ टक्यांच्यावर गुण मिळाले असून १०२ विद्यार्थ्यांनी ९० टक्कयांच्यावर गुण प्राप्त केले आहेत़एल़एच़पाटील स्कूलवावडदा येथील एल़एच़पाटील स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून सलग पाचव्या वर्षी देखील शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे़ या वर्षासाठी ४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ त्यामध्ये निखील अमृत चापे हा विद्यार्थी ९६ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे़ तर आचल राजू जैन व सुजल जगदिश जाधव ९५़४ टक्के गुण मिळवून द्वितीय तर हर्षदा संभाजी पाटील व मयूर संजय सुर्यवंशी यांनी ९५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे़करणसिंग दीपकसिंग चव्हाण यास ९४़२ टक्के तर विश्वेशकुमार सलामपुरिया यास ९३़६ टक्के गुण मिळाले आहे़ओरियनची शंभर टक्के निकालाची पंरपरा कायमओरियन सीबीएसई शाळेने यंदाही शंभर टक्के निकालाची पंरपरा कायम ठेवली आहे़ पार्थ सकळकळे व ओजल पाटील या दोन्ही विद्यार्थ्यांनी ९८ टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथक क्रमांक पटकाविला आहे़युगंधरा पाटील, आयुश शर्मा यांनी ९६़४० टक्के गुण मिळवून द्वितीय आणि पूर्वा चौधरी हिने ९६ गुण मिळविले आहेत. ३० विद्यार्थ्यांनी ९० टक्यांच्यावर गुण मिळविले आहे़यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्या सुषमा कंची यांनी कौतुूक केले.रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूलरुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतून अंश भंसाली ९७.८ हा प्रथम आला आहे़ गर्गी पाटील ९७.४ टक्के मिळवून द्वितीय, प्रणव चांडक ९७.२ टक्के मिळवून तृतीय आला. अनिकेत मित्तल व प्रियाल परवाणी हे ९७ टक्के मिळवून उत्तीर्ण झाले आहेत़ रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या ४८ विद्यार्थ्यांना ९० टक्यांच्यावर गुण मिळाले आहे़केंद्रीय विद्यालयात सुयश प्रथमकेंद्रीय विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेचा सुयश पाटील, अद्वितीया पाटील, अक्षय खनगरे हे विद्यार्थी ९२़८ टक्के गुण मिळवून प्रथम आले आहेत़ आयुष जाधव ९१़२ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. मानस चौधरी ९१ टक्के मिळवून तृतीय आली.इम्पीरियल इंटरनॅशनल स्कूलइम्पीरियल इंटरनॅशनल शाळेची विद्यार्थिनी दिव्या कुंभार हिने ८६ टक्के मिळवून शाळेतून पहिली आली आहे़ माधूसुदन बडगुजर, नीलेश बेलदार, देवेंद्र पाटील, भावेश महाजन, अरबाज खान, तेजपालसिंग पाटील आदी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत़ शंभर टक्के निकाल लागला असून शाळेची विद्यार्थिनी दिव्या ज्ञानेश्वर कुंभार हिने ८६ टक्के मिळवून शाळेतून पहिली आली आहे़पोदारच्या रियाला ९८़४० गुणपोदार इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. रिया बढे ही ९८़४० गुण मिळवून शाळेतून पहिली आली आहे़ जुही जावळे व राम खेतान या विद्यार्थ्यांनी ९७़८० टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान पटकाविले. रूतुजा पाटील ही ९७ टक्के गुण मिळवून तृतीय, शुभम बिर्ला ९६़८० टक्के गुण मिळवून चतुर्थ व निल कोठारी ९६़६० टके गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे़ तसेच अनेश पाटील व वैष्णवी बडगुजर यांनी ९६़४०, तर हिमांशू नवले याने ९६़२० टक्के गुण मिळविले आहे़ तसेच टीया लखीचंद जैन हिने ९६ टक्के गुण मिळविले आहे़ १९ विद्यार्थ्यांना ९५ टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहे़गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलगोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल जळगावच्या शाळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम आहे. स्कुलमधून ९८ टक्के मिळवत श्रेया अग्रवाल प्रथम, आर्यन जोशी ९५ टक्के व्दीतीय,चेतन किनगे, लिन्मय महाजन ९५ टक्के हे तृतीय, बखाल अनिल,निलेश चौधरी ९४ टक्के गुण मिळवत चवथे तर ताहेर कापसी, अवेश पटेल ९१ टक्के गुण मिळवून पाचवे ठरले आहेत़ खुशी नारखेडे, हुपेजा खान ८९ टक्के, कार्तीक चौधरी व पल्लवी मोरया ८७, उमामा शेख ८६.४, प्रेरणा अवचारे ८६.४ हर्षदा बोंडे ८६, शुभम वाघ ८३.४ शुशात बागुल ८७.४ टक्के गुण मिळवत उर्तीण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील,प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांनी अभिनंदन केले़२७ विद्यार्थ्यांना ९० च्यावर गुणकाशिनाथ पलोड स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. यात २७ विद्यार्थ्यांना ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले. अनुष्का विनय सोनवणे ही ९६़८ टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम आली आहे़ तर ईशांत नीलेश पाटील व टीना सतिष चौधरी , अथर्व भूषण कोतकर, अथर्व सतिष अत्तरदे हे ९६ टक्के गुण मिळवून द्वितीय ठरले़ ९५़८ टक्के गुण मिळवून श्वेता अनंत खडसे ही तृतीय, सोहम पुष्कराज वाणी व महेश प्रदीप शेकोकर ९५़६ टक्के गुण मिळवून चतुर्थ व अनिकेत पाटील हा ९५़२ टक्के गुण मिळवून पाचव्या स्थानी आला आहे़ मानसी अतुल वंजारी हिने ८० टक्के गुण मिळविले आहे़ समाजशास्त्र विषयात ६ विद्यार्थी, संस्कृतमध्ये १, गणित विषयात १ विद्यार्थ्याने शंभर पैकी शंभर गुण मिळविली आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव