शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

१०० कोटींच्या कामांचा अंमल अधांतरीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:01 PM

भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे रस्त्यांचा खर्च वाया जाईल

ठळक मुद्देदूध बूथ केंद्रांना मुदतवाढ

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाला नगरोथ्थानतंर्गत दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांना शनिवारी झालेल्या विशेष महासभेत मंजुरी देण्यात आली. मात्र, या निधीतून होणाºया कामांमध्ये ६५ कोटीची कामे ही रस्त्यांची आहेत. त्यामुळे आगामी भुयारी गटार योजनेमुळे ही कामे केल्यास रस्त्यांचा खर्च वाया जाईल, अशा परिस्थितीत ही कामे कशी होणार ? या विरोधकांच्या प्रश्नावर सत्ताधाºयांनी कोणतेही उत्तर न दिल्यामुळे १०० कोटीतून होणाºया कामांचे भवितव्य मात्र अधांतरीतच दिसून येत आहे.१०० कोटी रुपयांच्या कामांच्या मंजुरीसाठी शनिवारी मनपाची विशेष महासभा घेण्यात आली. महासभेला महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव सुभाष मराठे हे उपस्थित होते. सभेत १०० कोटी रुपयांमधन होणाºया १६२ कामांना मंजुरी देण्यात आली. यासह प्रभाग समित्यांच्या नवीन रचना देखील महासभेत करण्यात आली.दूध बूथ केंद्रांना मुदतवाढमहापौरांकडून दूध बुथ केंद्रांना मुदतवाढ देण्याचा प्रस्तावावर शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी दूध बुथ केंद्रांवर शासनाने प्रतिबंधित केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येवू नये अशी मागणी केली.स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांनी त्याबाबत योग्य नियमावली तयार करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीत बूथ चालकाचा परवाना रद्द करण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच मेहरुण तलावाच्या पेरीफेरीचे काम देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधीदेखील प्राप्त असून हे काम मार्गी लावण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.प्रभाग समिती रचनेचा प्रशासनाचा प्रस्ताव अमान्यप्रभाग समित्यांची रचनेचा प्रशासनाकडून आलेला प्रस्ताव सत्ताधारी भाजपाने बहुमताने नामंजुर करून, नव्याने प्रभाग समिती गठीत करण्याचा निर्णय या महासभेत घेण्यात आला. सत्ताधाºयांनी केलेल्या नवीन प्रभाग समिती रचनेमुळे चारही प्रभाग समित्यांवर भाजपाच्याच सभापतींची निवड ही आता निश्चित मानली जात आहे.१०० कोटीच्या निधीसाठी १०३ कोटींचा प्रस्ताव1 मनपाला नगरोथ्थान अंतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीसाठी नगरसेवकांकडून आलेल्या १०३ कोटी रुपयांच्या कामांची माहिती सभेत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी दिली. त्यानंतर शिवसेना नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० कोटी रुपयांबद्दल सत्ताधाºयांचे अभिनंदन केले.2 तसेच या निधीमुळे जळगावात विकास होणार असला तरी निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवताना तो १०० कोटी रुपयांचाच असणे गरजेचे असताना १०३ कोटी रुपयांचा कामांचा प्रस्ताव पाठवणे चुकीचे असल्याचे लढ्ढा यांनी सांगितले. तसेच १०३ कोटी रुपयांचा कामांचा प्रस्ताव पाठवल्यास शासन आपल्या पध्दतीने इतर ३ कोटीचे कामे रद्द केल्यास महत्वाचे कामे थांबू शकतात अशी माहिती दिली. 3 त्यावर आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी देखील शासनाकडे प्रस्ताव पाठवताना १०० कोटी रुपयांचाच पाठवावा अशा सूचना दिल्या. आयुक्त व नितीन लढ्ढा यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर कैलास सोनवणेंनी यांनी देखील १०३ कोटीच्या प्रस्तावातून जी महत्वाची कामे नाहीत अशी ३ कोटीच्या कामांना कात्री लावून १०० कोटी रुपयांच्याच कामांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.भुयारी गटार योजना असताना रस्त्यांची कामांवर खर्च का ? - नितीन लढ्ढा४ज्या शहरात पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे कामे आहेत.अशा शहरात रस्त्यांची कामे करण्यास शासनाने मंजुरी नाकारली आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांचा कामावर ६५ कोटी रुपयांचा खर्च करणे योग्य आहे का ? असा प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना कैलास सोनवणे म्हणाले की, ज्या भागात भुयारी गटार योजनेचे पहिल्या टप्प्यातील काम होत आहे. त्या भागात रस्त्यांची कामे घेण्यात आली नसल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. त्यावर लढ्ढा म्हणाले की, ज्या भागात रस्त्यांची कामे घेतली आहेत. त्या भागात तर दुसºया टप्प्यात भुयारी गटार योजना होणारच आहे. मग आता तयार करण्यात आलेले रस्ते त्यावेळी देखील खोदण्यात येणारच आहे ? मग खर्च का ? असे लढ्ढा म्हणाले. यावर मात्र सत्ताधारी भाजपाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.अशी करण्यात आली प्रभागसमिती रचना४प्रभाग समिती १- प्रभाग क्रमांक १,२,५,७,८४प्रभाग समिती २- प्रभाग क्रमांक ३,४,१५,१६,१७४प्रभाग समिती ३- प्रभाग क्रमांक ६,१३,१४,१८,१९४प्रभाग समिती ४- प्रभाग क्रमांक ९,१०,११,१२