भुसावळ, जि.जळगाव : पश्चिम बंगालमधील रेल रोको आंदोलनामुळे भुसावळ विभागातून जाणाºया १० गाड्या २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.रद्द करण्यात आलेल्या अप गाड्या अशागाडी क्रमांक १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस, १८०३० शालिमार -लो.टि.ट एक्सप्रेस, १२८१० हावडा -मुंबई मेल, १२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्सप्रेस, १२१०२ हावडा-लो. टि.ट ज्ञानेश्वरी एक्सप्रेस. हावडावरून सुटणाºया या गाड्या २४ तारखेपासून रद्द करण्यात आलेल्या आहेत.हावडाकडे जाणाºया डाऊनच्या रद्द गाड्यागाडी क्रमांक १२८५९ मुंबई- हावडा गीतांजली एक्सप्रेस, १८०२९ लो.टी.ट - शालिमार एक्सप्रेस, १२८०९ मुंबई-हावडा मेल, १२१२९ पुणे- हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, १२१५१ लो. टि.ट.- समरास्ता एक्सप्रेस या गाड्या मुंबईवरून २६ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
भुसावळ विभागातून जाणाऱ्या १० गाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:14 IST
फटका : प.बंगालमधील रेल रोकोचा परिणाम
भुसावळ विभागातून जाणाऱ्या १० गाड्या रद्द
ठळक मुद्देअप व डाऊनच्या एकूण १० गाड्यांचा समावेश२६ सप्टेंबरपर्यंत प्रवाशांची होणार गैरसोय