अमळनेर तालुक्यात १ लाख ३५ हजार वृक्ष लागवड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:48+5:302021-06-25T04:12:48+5:30

अमळनेर : तालुक्यात बिहार पॅटर्नअंतर्गत १ लाख ३५ हजार झाडे लावण्यात येणार असून पर्यावरण समृद्धीसह अनेकांना सुमारे २० कोटी ...

1 lakh 35 thousand trees will be planted in Amalner taluka | अमळनेर तालुक्यात १ लाख ३५ हजार वृक्ष लागवड होणार

अमळनेर तालुक्यात १ लाख ३५ हजार वृक्ष लागवड होणार

googlenewsNext

अमळनेर : तालुक्यात बिहार पॅटर्नअंतर्गत १ लाख ३५ हजार झाडे लावण्यात येणार असून पर्यावरण समृद्धीसह अनेकांना सुमारे २० कोटी रुपयांचा रोजगार मिळणार आहे.

शासनाने दरवर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वाढवले असून मोजक्या तालुक्यात प्रामाणिकपणे वृक्ष लागवड केली जाते. त्यात अमळनेर तालुका आघाडीवर आहे. मागील वर्षी २० हजार झाडे लावली होती. यावर्षी १ लाख ३५ हजार झाडे लावली जाणार आहेत. खड्डे खोदण्याचे काम सुरू झाले आहे. या माध्यमातून झाडे लावणे व जगवण्यासाठी २० कोटी २५ लाख रुपये रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पर्यावरण समतोलदेखील साधला जाऊन गरिबांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे.

वृक्ष लागवडीचे नियोजन हिंगोणे बुद्रुक- २०,०००

जवखेडा- २५,०००

दहिवद- १०,०००

गलवाडे बुद्रुक- २०,०००

गंगापुरी- २५,०००

भोरटेक- ५००० मारवड- १००० पिंपळे खुर्द- ५०००, तरवाडे- ५०००, निम- २०००, पिंपळी प्र. ज.- २०००, कन्हेरे- १०००, पातोंडा- २०००, ढेकू सिम- २०००, दहिवद- ५००, तांदळी- १०००, जळोद- २०००, वासरे- २००० याप्रमाणे वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

वृक्ष लागवडीमुळे ग्रामपंचायतीच्या भरपूर जागा सुशोभित होत आहेत. रस्त्याच्या कडा, शेताच्या बांधावर देखील लागवड होऊन भविष्यात तापमान वाढीच्या संकटावर नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे.

-संदीप वायाळ, सहायक गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर

Web Title: 1 lakh 35 thousand trees will be planted in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.