रंगात न्हाऊन निघाली तरूणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:48 IST2018-03-02T00:47:41+5:302018-03-02T00:48:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : शहरात गत अनेक वर्षांपासूनची होळीच्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा आजही कायम राहिली. शहरातील कपडा ...

रंगात न्हाऊन निघाली तरूणाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात गत अनेक वर्षांपासूनची होळीच्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा आजही कायम राहिली. शहरातील कपडा बाजार परिसरात रंगगाड्याच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला.
एका बैलगाडीमध्ये रंगाने भरलेला ड्रम घेऊन या मिरवणुकीला सुरूवात होते. यामध्ये प्रामुख्याने तरूणांचा मोठा सहभाग असतो. कपडा बाजार येथून हा रंगगाड जसजसा पुढे जातो तसे मिरवुणकीतील युवक रंगात न्हाऊन निघतात. यावर्षीही तरूणांचा मोठा उत्साह दिसून आला. शहराच्या ज्या भागातून हा रंगगाडा पुढे सरकत होता. मिरवणुकीत आणखी तरूणांची भर पडत होती.
सालाबादाप्रमाणे याहीवर्षी हत्ती रिसाला समितीच्या वतीने रंगपंचमीच्या दिवशी हत्ती रिसाला मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी शुक्रवारी काढण्यात येणा-या मिरवणुकीत रंगांऐवजी फुलांची व गुलालाची उधळण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.