तरूणांनी राम मंदिर परिसर केला चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:11+5:302021-02-25T04:38:11+5:30
टेंभुर्णी- गावातील तरूणांनी जर मनावर घेतले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. याचा प्रत्यय टेंभुर्णीकरांना नुकताच आला. एरवी वर्षानुवर्षे प्रयत्न ...

तरूणांनी राम मंदिर परिसर केला चकाचक
टेंभुर्णी- गावातील तरूणांनी जर मनावर घेतले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. याचा प्रत्यय टेंभुर्णीकरांना नुकताच आला. एरवी वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही येथील राम मंदिर परिसरातील घाण स्वच्छ होऊ शकत नव्हती. मात्र येथील तरुणांनी संत गाडगेबाबा यांचा वसा घेत मागील आठ दिवसांपासून येथे स्वच्छता अभियान राबवून हा परिसर चकाचक केला आहे.
येथील पुरातन राम मंदिरासमोरील मोकळ्या जागेवर नेहमीच घाणीचे साम्राज्य असायचे. या घाणीचा भाविक भक्तांसह शेजारच्या ग्रामस्थांना त्रास होत असे. अखेर मंदिर परिसरातील काही युवकांनी या भागाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन हा भाग स्वच्छ केला. या ठिकाणी आता पुष्पहाराचे दुकानही थाटल्या गेल्याने आणखी चैतन्य आले आहे. याकामी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही या युवकांना प्रोत्साहन दिले.
भविष्यात या जागेवर छोटेखानी सभागृह उभारले जाईल असे मंदिराचे विश्वस्त बद्री अग्रवाल यांनी सांगितले. यासाठी तरुण समाजसेवक नामदेव घोडके, संतोष घोडके, अनिल आमले, संजय जोशी, अरुण आमले, कल्पेश सोमानी, विजय खजाने, कार्तिक आमले, संतोष तांबेकर, लखन मुळे, राहुल नरवडे यांच्यासह विश्वस्त बद्रीप्रसाद अग्रवाल, गणेश सोमाणी आदींनी पुढाकार घेतला.
फोटो- स्वच्छतेनंतर चकाचक झालेला राममंदिर परिसर.