युवकांनी सत्कार्यातून शौर्य गाजवावे- साळवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST2021-01-08T05:39:59+5:302021-01-08T05:39:59+5:30
ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकाला फटका अंबड : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. बदलत्या वातावरणामुळे रब्बीतील पिकांना ...

युवकांनी सत्कार्यातून शौर्य गाजवावे- साळवे
ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकाला फटका
अंबड : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. बदलत्या वातावरणामुळे रब्बीतील पिकांना मोठा फटका बसत आहे. विशेषत: हरभरा पिकाला अधिक फटका बसला असून, फूल अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत. कीड नियंत्रणासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
घोषित सीड्स पार्कमध्ये जागा देण्याची मागणी
जालना : तत्कालीन शासनाने घोषित केलेल्या सीड्स पार्कमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र बीजोत्पादक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना देण्यात आले. यावेळी अध्यक्ष रामप्रसाद मुंदडा, सचिव दिनकर शेरेकर आदींची उपस्थिती होती.
मकरसंक्रांतीनिमित्त बाजारातील गर्दीत वाढ
जालना : मकरसंक्रांत सण जवळ आला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. सणानिमित्त लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी महिला, मुलींची लगबग सुरू आहे. बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी मात्र, सर्वांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.
अवैध प्रवासी वाहतूक; कारवाईची मागणी
मंठा : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे. अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक करीत आहेत. रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वाढलेले रस्ता अपघात पाहता ही अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.