युवकांचा कल ‘कॉन्टॅक्ट लेन्स’च्या वापराकडे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:36+5:302021-08-28T04:33:36+5:30
जालना : नंबर वापरणाऱ्या अनेकांनी आता चष्म्याला बायबाय करीत कॉन्टॅक्ट लेन्स वापराकडे कल दिला आहे. परंतु, कॉन्टॅक्ट लेन्स तज्ज्ञांनी ...

युवकांचा कल ‘कॉन्टॅक्ट लेन्स’च्या वापराकडे..!
जालना : नंबर वापरणाऱ्या अनेकांनी आता चष्म्याला बायबाय करीत कॉन्टॅक्ट लेन्स वापराकडे कल दिला आहे. परंतु, कॉन्टॅक्ट लेन्स तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनेनुसार वापरणे गरजेचे आहे.
डोळ्यांना नंबर लागला की संबंधित रुग्णाचे चष्म्याशिवाय कोणतेच काम होत नाही. त्यात ते नंबरचे चष्मे २४ तास सोबत ठेवताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी युवकांसह ज्येष्ठांनी कॉन्टॅक्ट लेन्स वापराकडे कल दिला आहे.
चष्म्याला करा बाय बाय...
ज्यांचा मोठा नंबर असतो त्यांना जाड चष्मे वापरावे लागतात. त्या चष्म्यातून काही भाग ब्लर दिसतो.
कॉन्टॅक्ट लेन्समुळे हे मोठे चष्मे आता निघत आहेत. चष्मे काळजीपूर्वक हाताळण्याची कसरतही थांबत आहे.
ही घ्या काळजी
कॉन्टॅक्ट लेन्स तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित स्वच्छ करणे गरजेचे आहे. ती डोळ्यातून काढ-घाल करण्यापूर्वी हात साफ करून घ्यावेत.
कॉन्टॅक्ट लेन्स परत बसविताना ती योग्य पद्धतीने बसविणे गरजेचे आहे. यात निष्काळजीपणा झाला तर जंतू संसर्गासह डोळ्याला इतर त्रास होऊ शकतात.
नेत्रतज्ज्ञ म्हणतात...
कॉन्टॅक्ट लेन्स वापराकडे अनेकांचा कल वाढला आहे. परंतु तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांचा वापर करावा. कॉन्टॅक्ट लेन्स साफ करताना हात अगोदर स्वच्छ करून घ्यावेत. नंतरच लेन्सची योग्य पद्धतीने काढ-घाल करावी.
- डॉ. गजेंद्र मुंडे
चष्म्यांचे ओझे दूर करण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्स हा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचे अनेक फायदेही संबंधित रुग्णाला मिळत आहेत. परंतु, कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यांचे पालन करावे.
- डॉ. संजय साळवे