शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:37+5:302021-01-08T05:41:37+5:30
इब्राईमपूर येथील घटना ; भोकरदन : शेततळ्याच्या भिंतीवरून चालत असताना पाय घसरून पडलेल्या २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ...

शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू
इब्राईमपूर येथील घटना
भोकरदन : शेततळ्याच्या भिंतीवरून चालत असताना पाय घसरून पडलेल्या २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील इब्राईमपूर येथे सोमवारी दुपारी घडली. पूजा सिधुसिंग डोभाळ (२०) असे मयत तरुणीचे नाव आहे.
भोकरदन शहरापासून चार किलोमीटर अंतर असलेल्या इब्राईमपूर येथील शेतात सिधुसिंग डोभाळ यांचे कुटुंब राहते. पूजा ही औरंगाबाद येथे बीडीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे पूजा मागील दहा महिन्यांपासून घरीच होती. सोमवारी दुपारी ती, तिच्या वहिनीसोबत शेततळ्यावर गेली होती. शेततळ्याच्या भिंतीवर चालत असताना पाय घसरून ती शेततळ्यात पडली. सोबतच्या महिलेने आरडाओरड केली
डॉक्टर बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले
पूजाही औरंगाबाद येथे बीडीएसचे शिक्षण घेत होती. तिला डॉक्टर बनायचे होते. त्यामुळे ती सतत अभ्यास करत होती