राणेंच्या विरोधात युवा सैनिक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST2021-08-25T04:35:22+5:302021-08-25T04:35:22+5:30
जालना : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवा सैनिकांनी आक्रमक भूमिका घेत ...

राणेंच्या विरोधात युवा सैनिक आक्रमक
जालना : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवा सैनिकांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी शहरातील अंबड चौफुलीवर आंदोलन केले. युवा सैनिकांनी राणे यांच्या पुतळ्यास जोडे मारून घोषणाबाजी केली.
युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, युवासेना उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकूर, युवासेना जिल्हा समनव्यक भरत सांबरे, अंकुश पाचफुले, नगरसेवक विजय पवार, घनश्याम खाकीवाले, पांडुरंग डोंगरे, युवासेना तालुकाप्रमुख गणेश मोहिते, नागेश डवले, शिंदे, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख, अशफाक पठाण, युवासेना तालुकाप्रमुख अजय कदम, रवी भुतेकर, युवासेना शहरप्रमुख योगेश रत्नपारखे, विक्रम कुसुंदल, पीटर खंदारे, दीपक वैद्य, नीलेश वाहुळे, ज्ञानेश्वर सुपारकर, संतोष परळकर, ताहेर खान, मोईन अब्दुल, सद्दाम
चाऊस, शैलेश घुमरे, अप्पा उगले, संदीप घारे, प्रमोद वाघमारे, उद्धव भुतेकर, अरुण कुरेशी, गणेश शिंदे, अप्पा घोडके, संभाजी घुले, सचिन शहाणे, राहुल शेळके यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो