३७ तासांनंतर त्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST2021-06-19T04:20:47+5:302021-06-19T04:20:47+5:30

पारध : भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील रायघोळ नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह ३७ तासांनंतर शुक्रवारी ...

The young man's body was found 37 hours later | ३७ तासांनंतर त्या तरुणाचा मृतदेह सापडला

३७ तासांनंतर त्या तरुणाचा मृतदेह सापडला

पारध : भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील रायघोळ नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह ३७ तासांनंतर शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सापडला आहे. शाहेद सय्यद असे मयताचे नाव आहे.

भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील सलीम सय्यद व शाहेद सय्यद हे दोन सख्खे चुलत भाऊ काम आटोपून घराकडे निघाले होते. बुधवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गावाजवळील नदीला पूर आला होता. दोन्ही तरुण नदीला पाणी असतानाही पुरातून जात होते. नदीपात्रात गेल्यानंतर पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दोघेही वाहून गेले. ग्रामस्थांनी धाव घेत सलीम सय्यदला बाहेर काढले. परंतु, शाहेद सय्यद हा पुरात वाहून गेला. तेव्हापासून शाहेदचा शोध सुरू होता. शुक्रवारी सकाळी गावापासून हाकेच्या अंतरावर शाहेदचा मृतदेह सापडला. त्याच्या पश्चात आई- वडील, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Web Title: The young man's body was found 37 hours later