वैजोडा येथे तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST2021-08-13T04:34:08+5:302021-08-13T04:34:08+5:30

आंबा : निम्न दुधनाच्या बॅक वाॅटरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ...

Young man drowns at Vaijoda | वैजोडा येथे तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

वैजोडा येथे तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

आंबा : निम्न दुधनाच्या बॅक वाॅटरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. गणेश रंगनाथ शिंदे (१९, रा. वैजोडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.

गणेश शिंदे हा परतूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. गुरुवारी दुपारी मित्रांसोबत तो शेतालगत असलेल्या निम्न दुधनाच्या बॅक वॉटरच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याला मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पूर्णपणे पाण्यात गेला होता. त्याच्या मित्रांनी आरडाओरड करताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे वैजोडा गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Young man drowns at Vaijoda